श्री गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदांमध्ये विसर्जन न करण्याविषयी आणि कागदी लगद्यापासून मूर्ती बनवणार्‍यांवर कारवाई करावी, यांसाठी यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीचे निवेदन सादर !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून निवेदन स्विकारतांना गृह विभागाचे नायब तहसीलदार डी.आर्. चपरीया

यवतमाळ, १६ सप्टेंबर (वार्ता.) – कृत्रिम हौदांमध्ये विसर्जन केल्याने श्री गणेशमूर्तीची विटंबना होते. ही रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नगरपालिका मुख्याधिकारी माधुरी मडावी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांना शहरामध्ये यापूर्वी राबवलेल्या कृत्रिम हौदांद्वारे श्री गणेशमूर्तींची विटंबना होत असलेली छायाचित्रे दाखवण्यात आली. ‘अशाप्रकारे श्री गणेशमूर्तींची विटंबना होणार नाही’, असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी या वेळी दिले. निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय फोकमारे आणि सनातन संस्थेचे श्री. सुधाकर कापसे उपस्थित होते.

नगरपालिका मुख्याधिकारी माधुरी मडावी यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

कागदी लगद्यापासून श्री गणेशमूर्ती बनवणार्‍यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदनही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गृह विभागाचे नायब तहसीलदार डी.आर्. चपरीया यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले.