कोल्हापूर येथे नियमभंग करून २१ फुटी श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक काढल्याने माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

१९ सप्टेंबर या दिवशी छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाने ४ फूट श्री गणेशमूर्तीची अनुमती असतांना नियमभंग करून २१ फुटी श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक काढल्याने माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासह १०० कार्यकर्त्यांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

वर्साेवा (मुंबई) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेली ५ मुले समुद्रात बुडली

१९ सप्टेंबरला अनंतचतुदर्शीच्या दिवशी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करतांना अंधेरी येथील वर्सोवा समुद्रकिनारी रात्री ९ वाजता ५ मुले बुडली. त्यांतील २ मुलांना वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले असून उर्वरित ३ मुले अजून बेपत्ता आहेत.

सातारा येथे गुलाल उधळणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांविरुद्ध गुन्हा नोंद !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक काढण्यावर बंदी घालण्यात आली होती. तरीही येथील मंडईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने वाजत-गाजत गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली.

प्रशासनाला अन्यत्रची गर्दी चालते; मात्र श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी चालत नाही !

‘हिंदु समाज सहिष्णू आहे. धर्मपरायण आहे; म्हणून हिंदूंच्या धर्माचरणावर निर्बंध आणले तरी चालतील’, या भ्रमात शासनाने राहू नये.

श्री गणेशचतुर्थीच्या तिसर्‍या दिवशी बिअरची बाटली घेऊन धांगडधिंगा घालून श्री गणेशमूर्ती विसर्जन केल्यावरून धार्मिक भावना दुखावल्याची पोलिसात तक्रार

हिंदूंना आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी धर्मशिक्षण न दिल्यामुळेच ही अशी परिस्थिती उद्भवली आहे.

महानगरपालिकेने नैसर्गिक जलस्रोत खुले करण्याची मागणी मान्य केली नाही ! – नरेश दहीबावकर, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

मागील वर्षी अनेक विसर्जनस्थळांवर दुरवस्था होती. काही ठिकाणी विसर्जनाच्या वेळी मूर्तीची विटंबना झाली. त्यामुळे संतप्त भाविकांनी समितीकडे तक्रार करत कृत्रिम तलावाला विरोध दर्शवला होता.

मानाच्या पाचही गणपतींचे यंदा उत्सव मंडपासमोरच विसर्जन  !

सार्वजनिक मंडळाच्या श्री गणेशमूर्ती जागेवरच विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. आज अनंतचतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील मानाचे ५ ही गणेशमूर्तींचे विसर्जन मंडपासमोरच अगदी साधेपणाने करण्यात आले.

निपाणी (जिल्हा बेळगाव) येथील नागरिकांनी श्री गणेशमूर्ती दानाकडे पाठ फिरवली !

मागील वर्षी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात श्री गणेशमूर्ती दान केल्या होत्या; मात्र पालिका प्रशासनाने श्री गणेशमूर्ती कचरा गाडीतून नेऊन पट्टरकुडी परिसरातील कचरा डेपोमध्ये ठेवल्या होत्या.

पुणे महापालिकेच्या वतीने घरच्या घरी श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेट जवळच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये तसेच श्री गणेशमूर्ती संकलन केंद्रांवर देण्याचा धर्मद्रोही निर्णय !

अमोनियम बायकार्बोनेट सारखे रासायनिक पदार्थ वापरून श्री गणेशमूर्तीचे विघटन करणे, हा श्री गणेशाचा अवमान आहे.

श्री गणेशमूर्तीची उत्तरपूजा आणि मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करण्याचे शास्त्र

श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन केल्यास मूर्तीतील चैतन्य सर्वदूर पोचते आणि अनेकांना त्याचा आध्यात्मिकदृष्ट्या लाभ मिळतो !