सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनासाठी केवळ १० कार्यकर्त्यांनाच अनुमती !

प्रातिनिधिक चित्र

कोल्हापूर, १८ सप्टेंबर – १९ सप्टेंबर या दिवशी असलेल्या अनंतचतुर्दशीनिमित्त असणार्‍या सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी काढण्यात येणार्‍या मिरवणुकांवर बंदी आहे. केवळ १० कार्यकर्त्यांनाच विसर्जनात सहभागी होण्यास पोलिसांनी अनुमती दिली आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन ‘इराणी खण’ येथे करण्यात येणार असून गणेशोत्सव मंडळांना महाद्वार रस्त्यावर प्रवेश बंद रहाणार आहे. या विसर्जनासाठी १२२ पोलीस अधिकारी, १ सहस्र ५६१ पोलीस कर्मचारी, १ सहस्र ५०० होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.