श्री गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक काढल्यास कारवाई होणार !

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची चेतावणी  

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन सार्वजनिक ठिकाणी न करता गर्दी टाळून ते करण्याचे आवाहन पोलीस करत आहेत; मात्र तरीही काही मंडळे विसर्जन मिरवणूक काढत आहेत. हा प्रकार उत्तमनगर, शनिवारवाडा परिसर आणि अन्य काही भागांत आढळून आला. मोठ्या स्वरात गाणी लावणे, तसेच गाण्यांवर नृत्य करणे हे प्रकारही घडले. हा प्रकार गंभीर असून गणेश विसर्जनाची मिरवणूक काढल्यास कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.