देहलीच्या जामा मशिदीमध्ये एकट्या मुलीला येण्यास बंदीचा आदेश विरोधानंतर इमाम बुखारी यांनी घेतला मागे

एखाद्या मंदिरामध्ये अशा प्रकारची बंदी घालण्यात आली असती, तर देशातील एकजात पुरो(अधो)गाम्यांनी एव्हाना देश डोक्यावर घेत आकांडतांडव केला असता; मात्र आता सारे काही शांत आहे !

राजस्थानमध्ये सामूहिक विवाह सोहळ्यात धर्मांतर : नवविवाहित जोडप्यांना हिंदुविरोधी शपथ

काँग्रेसच्या राज्यात असे होत असेल, यात आश्‍चर्य ते काय ?

आर्णी (जिल्हा यवतमाळ) येथे लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करण्यासाठी मोर्चा !

देहली येथील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या विरोधात येथील हिंदु संघटनांनी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्च्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, हिंदु जनजागृती समितीसमवेत संघटनांचे शेकडो स्त्री-पुरुष सहभागी झाले होते.

विश्व हिंदु परिषदेकडून अमरावती येथे निदर्शने !

देहलीत घडलेल्या श्रद्धा वालकर प्रकरणाचा निषेध करण्यासाठी, तसेच आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी राजकमल चौक येथे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गावाहिनीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जनआक्रोश आंदोलन !

‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लवकरच आणावा, या मागणीसाठी इचलकरंजी येथील मलाबादे चौकात विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गावाहिनीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.

(म्हणे) ‘राम, कृष्ण यांनी आमच्या जातीवर अन्याय केला !’

निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांच्या बिहारमधील जनसुराज्य यात्रेच्या वेळी येथे एका सभेमध्ये गोरख महतो या निवृत्त शिक्षकाने ‘राम, द्रोणाचार्य, कृष्ण आणि विश्वकर्मा यांनी आमच्या जातीवर अन्याय केला आहे’, असे विधान केले.

मंगळुरू येथील मलाली मशिदीच्या वादावर सर्वेक्षणाच्या मागणीवर न्यायालय सुनावणी करणार

मलाली मशीद ही पूर्वीचे हिंदु मंदिर असल्याचा विहिंपचा दावा !

विहिंपच्या हितचिंतक मोहिमेतून धर्मांतर, लव्ह जिहाद आणि गोवंश रक्षण यांविषयी जागृती करणार !

विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने ६ नोव्हेंबरपासून संपूर्ण देशात हितचिंतक, म्हणजेच सदस्यता मोहीम चालू करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरपर्यत संपूर्ण भारतात हिंतचिंतक मोहीम चालू रहाणार आहे.

रामराज्य दिग्विजय रथयात्रेचे गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्स्फूर्त स्वागत !

‘रामराज्य’ म्हणजेच ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे, देशाचे नाव ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असे करणे, देशात शिक्षणात ‘रामायणा’चा समावेश करणे, कालगणना ‘ख्रिस्तपूर्व’ (ए.सी.) आणि ‘ख्रिस्तानंतर’ (डी.सी.) याऐवजी प्रभु श्रीरामाच्या पूर्वी अन् प्रभु श्रीरामाच्या नंतर अशी करावी, असे संकल्प करून या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.’’

कल्याण येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने ६ नोव्हेंबरला रक्तदान शिबीर !

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने कल्याण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.