कल्याण येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने ६ नोव्हेंबरला रक्तदान शिबीर !


ठाणे, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने कल्याण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर येथील पूर्व भागात असलेल्या नूतन ज्ञान मंदिर विद्यालय येथे ६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल. या रक्तदान शिबिरात जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने करण्यात आले आहे.