विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गावाहिनीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जनआक्रोश आंदोलन !

आंदोलनात सहभागी कार्यकर्ते

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – प्रेमाच्या नावाखाली हिंदु मुलींची फसवणूक करून जिहाद करण्याचे काम आफताबसारख्या जिहादी वृत्तीकडून सर्वत्र होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी, तसेच ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लवकरच आणावा, या मागणीसाठी इचलकरंजी येथील मलाबादे चौकात विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गावाहिनीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘मातृशक्ती’ शहर संयोजिका सौ. स्मिता हंचनाळे म्हणाल्या, ‘‘युवती-महिला यांनी खोट्या प्रेमाच्या आमीषाला बळी पडू नये. फसवणूक होत असल्यास ‘मातृशक्ती’शी संपर्क साधावा. मातृशक्तीच्या वतीने घेण्यात येणार्‍या लाठी-काठी प्रशिक्षणात सहभागी होऊन स्वरक्षणाचे धडे घ्यावेत.’’

जनआक्रोश आंदोलनाचे प्रास्ताविक अमित कुंभार यांनी केले. या प्रसंगी शहरमंत्री प्रवीण सामंत, सोमेश्वर वाघमोडे, सनतकुमार दायमा, बाळासाहेब ओझा, अनिल सातपुते, अरुणा माने, कविता पसनूर, संगीता मस्के, दीपाली निकम, संगीता चव्हाण यांसह विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.