राजस्थानमध्ये सामूहिक विवाह सोहळ्यात धर्मांतर : नवविवाहित जोडप्यांना हिंदुविरोधी शपथ

जयपूर – राजस्थानमधील भरतपूर येथे पार पडलेल्या एका सामूहिक विवाह सोहळ्यात नवविवाहित जोडप्यांना हिंदुविरोधी शपथ देण्यात आल्याचे समोर आले आहे. या विवाह सोहळ्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये ११ नवविवाहित जोडप्यांना शपथ दिली जात असतांना दाखवण्यात आले आहे. यामध्ये ‘मी ब्रह्मा, विष्णु, महेश आणि गणेश यांना मानणार नाही आणि त्यांची पूजा करणार नाही’, अशी शपथ ते घेत असल्याचे दिसत आहेत. या शपथेविषयी आक्षेप घेत विश्‍व हिंदु परिषदेने आंदोलनाची चेतावणी दिली आहे.

ऑक्टोबरमध्ये देहलीतही अशाच पद्धतीने नवविवाहित जोडप्यांना हिंदुविरोधी शपथ देण्यात आली होती. त्या कार्यक्रमात आम आदमी पक्षाचे नेते राजेंद्र पाल गौतमही सहभागी झाले होते. याविषयीचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर या मंत्र्यांना त्यागपत्र द्यावे लागले होते.

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्या राज्यात असे होत असेल, यात आश्‍चर्य ते काय ?