आर्णी (जिल्हा यवतमाळ) येथे लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करण्यासाठी मोर्चा !

हिंदु संघटनांची राष्ट्रपतींकडे मागणी !

मोर्चात सहभागी हिंदू

आर्णी (यवतमाळ), २२ नोव्हेंबर (वार्ता.) – देहली येथील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या विरोधात येथील हिंदु संघटनांनी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्च्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, हिंदु जनजागृती समितीसमवेत संघटनांचे शेकडो स्त्री-पुरुष सहभागी झाले होते. हिंदूंच्या संदर्भात सातत्याने घडणार्‍या या घटनांच्या विरोधात लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करावा अन् गौैरवशाली हिंदु धर्माचे रक्षण करावे, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली.