वारकरी अधिवेशनात हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात कृती करण्याचा एकमुखी निर्धार !

आळंदी येथे श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे झालेल्या १७ व्या वारकरी अधिवेशनात हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात कृती करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला.

धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आल्यास रामराज्य येईल ! – पू. श्री अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी)

आळंदी येथील वारकरी अधिवेशनासाठी ५०० हून अधिक वारकर्‍यांच्या उपस्थितीत ‘धर्मजागर’ करण्याचा निर्धार !

देहू (जिल्हा पुणे) येथील गायरान भूमीसाठी वारकरी लढा देतील ! – ह.भ.प. माणिक महाराज मोरे, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज

देहू येथील गायरान भूमी ही देवस्थानाच्या धार्मिक कार्यासाठी वापरली जावी, यासाठी येथील वारकरी उपोषणाला बसले होते. ‘तीर्थक्षेत्र वाचवा आणि गायरान वाचवा’, अशी हाक देऊन हे उपोषण केले होते. मागील २ मासांपासून आम्ही गाव बंद आंदोलन केले, तसेच प्रभात फेरी काढून जनजागृतीही केली.

शालेय पोषण आहार योजनेत अंड्यांचा समावेश करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला विरोध !

आळंदी – ७ नोव्हेंबर २०२३ या दिवशी शासनाने एक परिपत्रक काढले आहे. यानुसार ‘पंतप्रधान पोषण आहार योजने’च्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने इयत्ता ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंड्यांचा समावेश केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, महानुभव संप्रदाय, जैन संप्रदाय, तसेच विविध आध्यात्मिक संप्रदायांचे भाविक दु:खी झाले आहेत. शिक्षण विभागाच्या या निर्णयाला भाजप … Read more

श्रीक्षेत्र आळंदीसह सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांचा परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करा ! – आळंदी येथे वारकरी अधिवेशनात एकमुखी मागणी

वारकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी ९ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे १७ व्या वारकरी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.

दिंडीला पोलीस बंदोबस्त देण्याची वारकर्‍यांची मागणी !

कार्तिकी वारीला पुणे-मुंबई महामार्गावरून आळंदीकडे येणार्‍या वारकर्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

नामदेव महाराज दिंडीच्या मार्गातील खड्डे बुजवण्याच्या वारकर्‍यांनी केलेल्या मागणीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वारकर्‍यांचा नाहक मृत्यू झाला आहे. अजून किती वारकरी दगवल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे ?

छत्रपती संभाजीनगर येथील माध्यान्ह भोजनात अंडी नकोच; ठाकरे गटासह जैन संघटनेचा कडाडून विरोध !

केंद्र सरकारने माध्यान्ह भोजनात शालेय विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोनदा अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शाळेत भेद निर्माण करणारा आहे.

तणावमुक्तीसाठी भगवंताचे नामस्मरण करायला हवे ! – पुरुषोत्तम महाराज पाटील, कीर्तनकार

‘रामकृष्णहरि’ नामस्मरण. हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे. यातील रामाचा विचार, कृष्णाचा आचार आणि हरीचा उच्चार करा, त्यामुळे तणावातून मुक्तता मिळेल. त्यासाठी श्रद्धेने भगवंताचे नामस्मरण करायला हवे, अशी भावना आळंदी येथील कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी व्यक्त केली.

अहिल्यानगर येथील श्री कानिफनाथ देवस्थान येथील मारहाणप्रकरणी धर्मांधांवर कठोर कारवाई करावी !

राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथील गुहा गावातील श्री कानिफनाथ देवस्थानामध्ये मुसलमानांकडून वारकर्‍यांवर आक्रमण करण्यात आले होते.