बिहारमध्ये गोतस्करांना पकडणार्‍या गोरक्षकांवर दरोड्याचा गुन्हा नोंदवला जातो ! – आचार्य चंद्र किशोर पाराशर, संस्थापक, आंतरराष्ट्रीय सनातन हिंदु वाहिनी

गोतस्करी थांबवतांना आमच्यावर दरोड्याचे गुन्हे लावण्यात येतात. दुर्दैवाने या कार्यासाठी जनता पुढे येत नाही. एक पशूवधगृह बंद झाल्यावर ते दुसर्‍या ठिकाणी चालू करण्यात येते, असे संतप्त उद्गार त्यांनी काढले.

गोरक्षकांवरील आक्रमणाचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात निषेध !

गोरक्षकांवर आक्रमण करणार्‍यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत २२ जून या दिवशी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात गोरक्षकांवरील आक्रमणाचा निषेध करण्यात आला.

धर्मांतरितांचे शुद्धीकरण केल्यानंतर कायदेशीर वैधता प्राप्त होण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी ! – अधिवक्ता नागेश जोशी, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद, गोवा

हिंदूंचे अन्य पंथात धर्मांतर झाल्याची कागदपत्रे मिळतात; पण हिंदु धर्मात ‘घरवापसी’ झाल्याची कागदपत्रे बहुदा मिळत नाहीत. त्यामुळे कागदोपत्री माहितीला जमा करण्याला महत्त्व आहे.

भारतीय राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढून टाकण्याची वेळ आली आहे ! – अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी, महासचिव, अखिल भारतीय कायदेशीर साहाय्य संस्था, बंगाल

बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांमुळे आसाम, मिझोरम आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील ८ सहस्र गावे मुसलमानबहुल झाली आहेत. या सर्व गावांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक मुसलमान आहेत.

अभिव्यक्तीस्वातंत्र्याची दिशा भारतविरोधी शक्तींनी निश्चित केली आहे !- चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

शबरीमला मंदिरामध्ये स्त्रियांच्या प्रवेशासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सूत्र उपस्थित केले जाते; मात्र अन्य धर्मियांच्या विषयी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले मूग गिळून गप्प रहातात.

प्रत्येक हिंदु कुटुंबाने २ गायी पाळल्या, तर भारतात गोशाळांची आवश्यकता भासणार नाही ! – अधिवक्ता आलोक तिवारी, उपाध्यक्ष, जांबाज हिंदुस्थानी सेवा समिती, उत्तरप्रदेश

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आमच्यासाठी गुरु द्रोणाचार्याप्रमाणे आहेत. परमपूज्य डॉ. आठवलेगुरुजी यांना पाहिल्यावर पुष्कळ ऊर्जा मिळते. तशीच ऊर्जा या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये सहभागी झाल्यावर मिळत असते आणि ती आम्हाला वर्षभर पुरते.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्याकडून ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचा उद्घोष !

आतंकवाद्यांचे रूप घेऊन धर्मांध हिंदूंना मारण्यासाठी सिद्ध झाले आहेत. स्वत:च्या रक्षणासाठी प्रत्येक गावातील हिंदूंनी शस्त्रविद्या शिकून घ्यावी, अन्यथा भविष्यकाळात धर्मांधांकडून हिंदू मारले जातील.

लोकसभा निवडणुकीपूर्वी गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करावे ! – श्री १००८ महाशक्ती पीठाधीश्‍वर श्री शक्तीजी महाराज, श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठान, अमरावती

गोमातेची तस्करी करतांना वाहनांमध्ये गायींना कोंबण्यात येते. नाकात दोरी घालून त्यांची दुर्दशा केली जाते. सरकारकडून २ सहस्र रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय तत्परतेने घेतला जाऊ शकतो, तर गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्याचा निर्णय तत्परतेने का होऊ शकत नाही ?

पुढील अधिवेशनापूर्वी १ सहस्र गावांमध्ये हनुमान चालिसा चालू करणार ! – कमलेश कटारिया, अध्यक्ष, संकल्प हिंदु राष्ट्र अभियान, संभाजीनगर

हिंदु धर्मावरील सर्व आघातांवर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हा एकमेव उपाय आहे. ‘जागरूक आणि संघटित हिंदूच हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकतील, असे वक्तव्य संभाजीनगर येथील संकल्प हिंदु राष्ट्र अभियानाचे अध्यक्ष श्री. कमलेश कटारिया यांनी केले.

हिंदु राष्ट्राच्या या धर्मयुद्धात कितीही अडचणी आल्या, तरी आम्ही सतत पुढे जात रहाणार ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

प्रारब्धानुसार प्रत्येकाला सुख-दु:ख भोगावे लागते. धर्मकार्य करत असतांना कधी कधी पोलिसांचा दबाव असतो. काही वेळा समाजाचाही विरोध होतो. आपली साधना असल्यास अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर रहाता येते. तसेच आपले कार्य अखंड चालू ठेवता येते.