रामनाथी, २२ जून (वार्ता.) – सद्यःस्थितीत भारतात ६ कोटी बांगलादेशी घुसखोर आहेत. हे सर्व घुसखोर खोट्या ओळखपत्रांच्या आधारे भारतात रहात असूनही केवळ मतांच्या राजकारणासाठी शासनकर्ते या घुसखोरांकडे दुर्लक्ष करत आहेत. सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन याविषयी सर्वेक्षण करायला हवे. बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांमुळे आसाम, मिझोरम आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील ८ सहस्र गावे मुसलमानबहुल झाली आहेत. या सर्व गावांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक मुसलमान आहेत. या घुसखोर मुसलमानांमुळे भारताच्या अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
‘लँड जिहाद’, ‘पॉप्युलेशन (लोकसंख्या) जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांद्वारे या घुसखोर मुसलमानांनी भारताची अंतर्गत सुरक्षितता धोक्यात आणली आहे. ज्या वेळी भारत स्वातंत्र झाला, त्या वेळीच भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणे अपेक्षित होते; कारण देशाची विभागणी धर्माच्या आधारावर झाली होती; मात्र आता ही चूक सुधारण्याची वेळ आली आहे. राज्यघटनेतून ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) हा शब्द काढून टाकण्याची वेळ आली आहे, असे उद्गार बंगाल येथील ‘अखिल भारतीय कायदेशीर साहाय्य संस्थे’चे महासचिव अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी यांनी काढले. ते येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सप्तम दिनी (२२.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.