रामनाथी, २२ जून (वार्ता.) – आपल्याला झोपलेल्या हिंदूंना जागे करून संपूर्ण विश्वामध्ये हिंदु राष्ट्र स्थापन कारायचे आहे. सर्व हिंदू ध्वनीक्षेपकावरून होणार्या ५ वेळेच्या अजानमुळे त्रस्त आहेत. त्याप्रमाणे आम्हीही त्रस्त होतो. ते थांबवणे आपल्या आवाक्यात नव्हते; म्हणून त्याला मोठा पर्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यानुसार आम्ही सर्व हिंदूंनी मिळून शहरामध्ये एक ६५ फूट उंच ‘श्रीराम टॉवर’ उभारला आणि त्यावर २५ ध्वनीक्षेपक लावले. तसेच त्यावरून सकाळ-संध्याकाळ हनुमान चालिसा लावण्यात येते. यातून हिंदू एकत्र आले, तर काय होऊ शकते, हे लक्षात आले. ‘श्रीराम टॉवर’वरून प्रेरणा घेऊन परिसरातील अनेक गावांनी ‘श्रीराम टॉवर’ची मागणी केली. एका गावाच्या सरपंचांनी १ मासाच्या आत त्यांच्या गावात टॉवर उभारण्याचा निश्चय केला. हिंदूंच्या सणांवर प्रशासनाकडून अनेक निर्बंध लादले जायचे. तसेच हिंदू संस्कृतीपासून दूर चालले हाते. त्यामुळे श्रीराम युवा सेनेने हिंदूंने सर्व महत्त्वाचे सण सार्वजनिकपणे साजरे करणे चालू केले, असे उद्गार मध्यप्रदेश येथील ‘श्रीराम युवा सेने’चे प्रदेश महामंत्री श्री. हरिश जोशी यांनी काढले. ते येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सप्तम दिनी उपस्थितांना संबोधित करत होते.
श्री. हरिश जोशी पुढे म्हणाले, ‘‘वर्ष २०१५ मध्ये हिंदु जनजागृती समितीशी संपर्क झाला. त्या वेळेच्या हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये मी आमदार राजासिंह यांचे भाषण ऐकले. त्यानंतर मी कट्टर हिंदु बनण्याचे ठरवले. आमदार राजासिंह आमचे आदर्श आहेत. त्यांच्याप्रमाणे आम्हीही गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर यांच्या विरोधात कार्य करतो. हिंदुत्वाचे कार्य करत असल्याने माझ्यावर आणि माझ्या भावावर विरोधकांनी आक्रमणे केली; पण ईश्वराच्या कृपेने त्यातून आमचे रक्षण झाले.’’