रामनाथी, २२ जून (वार्ता.) – मंगळग्रह मंदिरामध्ये ‘व्हिआय्पी’ प्रवेशपद्धत नाही. मंदिरामध्ये विश्वस्तांच्या नावाचा एकही फलक नाही. मंदिरातील सर्वांना आम्ही ‘सेवेकरी’ असे परिचयपत्र दिले आहे.
( सौजन्य : Mangal Graha Mandir, Amalner)
मंदिरांसाठीची वस्त्रसंहिता प्रथम मंगळग्रह मंदिरामध्ये लागू करण्यात आली. या वेळी काही जणांनी विरोध केला; मात्र भाविकांनी वस्त्रसंहितेचे समर्थन केले. मंदिरांमध्ये तोकडे कपडे घालून येणार्यांना आम्ही नम्रपणे पूर्ण वस्त्रे देतो आणि तेच परिधान करून मंदिरात प्रवेश करण्याची विनंती करतो.
मंदिरांमध्ये प्रवेश करतांना आपल्या संस्कृतीनुसार वस्त्रे परिधान करायला हवीत, असे उद्गार अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील ‘श्री मंगळग्रह सेवा संस्थे’चे अध्यक्ष श्री. डिगंबर महाले यांनी काढले. ते येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सातव्या दिवशी उपस्थितांना संबोधित करत होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी गौरवोद्गार !१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या दर्शनाने जीवन कृतार्थ झाले. त्यांच्याकडून इतकी ऊर्जा मिळाली की, तिचे वर्णन शब्दांमध्ये करू शकत नाही. जेथे शब्द संपतात, तेथे त्यांची शक्ती चालू होते. त्यांनी जी ज्ञानाची शिदोरी दिली, ती येथून आम्ही घेऊन जाणार आहोत. |