वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला सहकार्य करणार्‍यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार !


रामनाथी, २२ जून (वार्ता.)
– वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडण्यासाठी साहाय्य करणार्‍या सर्व ज्ञात-अज्ञात मान्यवरांचे या वेळी आभार व्यक्त करण्यात आले.

श्री रामनाथ देवस्थानचे श्री. अवधूत कुंकळीकर (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी श्री रामनाथ देवस्थानकडून सभागृह, तसेच निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. यानिमित्त श्री रामनाथ देवस्थानचे श्री. अवधूत कुंकळीकर यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केला.

श्री गौड पादाचार्य मठाचे व्यवस्थापक श्री. कालिदास मुटकेकर (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

यासह हिंदुत्वनिष्ठांची निवासव्यवस्था केल्याविषयी कवळे येथील श्री गौड पादाचार्य मठाचे व्यवस्थापक श्री. कालिदास मुटकेकर यांचा सत्कार पुष्पहार घालून, तसेच शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केला आणि आभार व्यक्त केले.

श्री नागेश महारुद्र देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. दामोदर भाटकर (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

नागेशी येथील श्री नागेश महारुद्र देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. दामोदर भाटकर यांचा सत्कार पुष्पहार घालून, तसेच शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केला आणि आभार व्यक्त केले.

श्री महालक्ष्मी देवस्थानचे सचिव श्री. आशुतोष सरदेसाई (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

बांदिवडे येथील श्री महालक्ष्मी देवस्थानचे सचिव श्री. आशुतोष सरदेसाई यांचा सत्कार पुष्पहार घालून, तसेच शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केला आणि आभार व्यक्त केले.

श्री महालसा देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. प्रेमानंद कामत (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

म्हार्दाेळ येथील श्री महालसा देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. प्रेमानंद कामत यांचा सत्कार पुष्पहार घालून, तसेच शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केला आणि आभार व्यक्त केले.

श्री नवदुर्गा देवस्थान समितीचे व्यवस्थापक श्री. प्रभाकर भट (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

मडकई येथील श्री नवदुर्गा देवस्थान समितीचे व्यवस्थापक श्री. प्रभाकर भट यांचाही सत्कार पुष्पहार घालून, तसेच शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केला आणि आभार व्यक्त केले.