काश्मीरमधून भगवा नष्ट झाल्यामुळे नंतर तेथे तिरंग्यालाही स्थान राहिले नाही ! – विनोद यादव, संस्थापक, धर्मरक्षक, भोपाळ

( प्रातिनिधिक छायाचित्र )

रामनाथी, २२ जून (वार्ता.) – एका वृत्तवाहिनीचे पत्रकार रविश कुमार यांनी एकदा म्हटले होते की, ‘मुसलमानांची संख्या वाढली, तर कोणता डोंगर कोसळणार आहे ?’ मुसलमानांची संख्या वाढल्याने डोंगर कोसळला नाही; पण देश तुटला. आणि लक्षावधी हिंदूंच्या हत्या झाल्या. आता भोपाळ आतंकवादाचा गड बनत चालले आहे. तेथे सातत्याने आतंकवादी पकडले जात आहेत. येथील एका गावात प्रारंभी १ मुसलमान रहायला आला. त्याने मशीद बनवली. नंतर त्याच्या ८ मुलांच्या नावाने ८ घरे बनली. अशा पद्धतीने त्यांची संख्या वाढत चालली आहे आणि हिंदू निद्रिस्त आहेत. धर्मांध जेव्हा हिंदुत्वनिष्ठांची हत्या करतात, तेव्हाही ती इस्लामी पद्धतीने करतात. हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी यांचीही हत्या बंदुकीने नाही, तर सुरीने मान कापून केली. लक्षात घ्या, काश्मीरमधून भगवा नष्ट झाल्यामुळे नंतर तेथे तिरंग्यालाही स्थान राहिले नाही ! त्यामुळे या देशात तिरंगा सुरक्षित रहाण्यासाठी म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा अबाधित रहाण्यासाठी भगवा ध्वज म्हणजेच हिंदु धर्म सुरक्षित रहाणे अपरिहार्य आहे,

विनोद यादव, संस्थापक, धर्मरक्षक, भोपाळ

असे परखड उद्गार भोपाळ येथील ‘धर्मरक्षक’ संघटनेचे संस्थापक श्री. विनोद यादव यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सप्तम दिनी (२२.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.