गृह विभागाच्या प्रयोगशाळांमध्ये डी.एन्.ए. चाचण्यांसाठी लागणारे किट्स उपलब्ध नाहीत ! – ठाकरे गट

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – राज्य सरकारच्या गृह विभागाच्या अखत्यारित येणार्‍या वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये डी.एन्.ए.(अनुवंशिकतेच्या चाचण्यांसाठी लागणारे किट्स नसल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

अनेक गुन्ह्यांच्या प्रकरणात डी.एन्.ए. चाचण्यांचे अहवाल गुन्हा सिद्ध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात; परंतु काही अतीमहत्त्वाच्या खटल्यांमधील लोकांना अप्रत्यक्ष साहाय्य करण्यासाठी या किट्सचा तुटवडा निर्माण केला असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी ‘एक्स’वरही टाकले आहे.