‘सनराईज’ कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पहाणी केली. आगीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक मृताच्या कुटुंबियांसाठी सरकारने ५ लाख रुपये घोषित केले आहेत.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहा १०० कोटी रुपयांची मागणी केली होती ! 

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका गृहमंत्र्यावर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने अशा प्रकारच्या खंडणीचा केला आरोप ! आरोप गंभीर असल्याने त्याची नोंद घेऊन मुख्यमंत्र्यांनी याविषयी जनतेला वस्तूस्थिती सांगणे आवश्यक !

सचिन वाझे यांना ‘ऑपरेट’ करणार्‍या सरकारमधील लोकांचा शोध घ्या ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

परमवीर सिंह यांना पदावरून हटवून हे प्रकरण संपणार नाही. सिंह आणि वाझे हे छोटे लोक आहेत. त्यांना कुणाचा आशीर्वाद आहे, याचा शोध घ्यायला हवा.

शरजील उस्मानी याला जामीन मिळवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे साहाय्य ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विधानसभा

शरजील उस्मानी यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये भादंविचे ‘२९५ अ’ हे विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे कलम पद्धतशीरपणे वगळण्यात आले.

राज्यात केवळ १० दिवस पुरेल इतकाच कोरोनावरील लसीचा साठा शिल्लक ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

साधारणपणे २ कोटी २० लाख डोस आपल्याला आवश्यक आहेत. येत्या ३ मासांत हे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. साधारण प्रती आठवड्याला २० लाख डोस आवश्यक आहेत.

शरद पवार यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात आलेल्या अटकेवरून विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर आरोप करण्यात येत आहेत. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

राज्यात कडक दळणवळण बंदी करण्यास भाग पाडू नये ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने आणि नियम न पाळल्याने संसर्ग वेगाने वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे. हॉटेल आणि उपाहारगृहे यांनी नियमांचे पालन करावे.

…तर स्वराज्यासह सुराज्य आणू शकतो का ? हा विचार व्हायला हवा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अद्यापही सुराज्य आलेले नाही, हे उघड सत्य कुणीही नाकारू शकत नाही. हिंदु राष्ट्राची स्थापना ही सुराज्याची संकल्पना आहे. त्यासाठी प्रत्येक राष्ट्रप्रेमीने योगदान द्यायला हवे !

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात काही ठिकाणी कडक दळणवळण बंदी लागू करावी लागेल !

अद्यापही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही; पण ‘ती जाऊ नये’, असे वाटत असेल, तर कोरोनाविषयक बंधने पाळणे आवश्यक आहे. येत्या दिवसांमध्ये राज्यातील काही ठिकाणी कडक दळणवळण बंदी लागू करावी लागेल.

विरोधकांनी तपासाला दिशा देण्याचे काम करू नये ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

सचिन वाझे काही वर्षांपूर्वी शिवसेनेत होते; मात्र त्यांनी सदस्यत्वाचे नूतनीकरण केले नाही. सध्या त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. सचिन वाझे हा ओसामा बिन लादेन असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे.