दळणवळण बंदीच्या दिवसांच्या निश्‍चितीअभावी आज पुन्हा ‘टास्क फोर्स’ ची बैठक !

११ एप्रिल या दिवशी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ८ दिवसांची कडक दळणवळण बंदी असावी, असे मत मांडले, तर ‘टास्क फोर्स’ च्या सदस्यांनी दळणवळण बंदी १४ दिवसांची असावी, असे मत मांडले…..

११ एप्रिल या दिवशीच्या ‘टास्क फोर्स’ बैठकीनंतर दळणवळण बंदीचा निर्णय घेऊ ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

१० एप्रिल या दिवशी सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि अन्य राजकीय पक्ष यांच्या समवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांसह उपस्थित सर्वांनी दळवळणबंदीचे निर्बंध कडक करण्याला सहमती दर्शवली.

शासनाचे ‘जम्बो कोविड सेंटर्स’ खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावेत ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘कोविड सेंटर्स’ मध्ये खासगी रुग्णालयातील डॉक्टर आल्यास उपचारासाठी साहाय्य होईल. महाराष्ट्र एकवटल्यावर तो जिंकतो. यामध्ये तुम्ही महत्त्वाचा दुवा आहात, असे खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले.

पुणे येथील दळणवळण बंदीच्या निर्णयाला व्यापारी संघटनांचा विरोध, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

राज्य सरकार पाठोपाठ पुणे महापालिकेने शहरात घोषित केलेल्या दळणवळण बंदीच्या निर्णयाचा येथील व्यापारी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे.

विरोधक वा तज्ञ यांचा दु:स्वास करून नाही, तर प्रत्यक्ष कृतीचे विवेचन कोरोना थांबवायला साहाय्यक ठरेल ! – देवेंद्र फडणवीस

मागील वर्षभरापासून आम्ही रस्त्यावरच आहोत. रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजावून सांगण्याची, त्यांच्या साहाय्याला धावून जाण्याची आमची सिद्धता आहे. तुलना केवळ परिस्थितीशी नको, तर सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे.

राज्य सरकार कोविड अल्प करण्यात नाही, तर लोकांना त्रास देण्यात गुंतलेले ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या भाषणात कोव्हिड का वाढत आहे ? तो आपल्या महाराष्ट्रातच का वाढत आहे ? त्यावर आम्ही काय उपाययोजना करतो आहोत, हे सांगण्याची आवश्यकता होती….

तज्ञांशी बोलून येत्या २-३ दिवसांत दळणवळण बंदीविषयीचा निर्णय घेणार ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

शासन जनतेच्या हितासाठीच पावले उचलत आहे; मात्र परिस्थिती अशीच राहिली, तर आहे ती परिस्थिती उघड्या डोळ्यांनी मी स्वीकारू शकत नाही. आता मी पूर्ण दळणवळण बंदीची चेतावणी देत आहे; मात्र आता दळणवळण बंदी घोषित करत नाही.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन

हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे ३१ मार्च या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता बाळासाहेबांचे सुपुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन आणि कोनशिला स्थापनेचा कार्यक्रम झाला.

विरोधकांनी केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी निरर्थक ! – प्रणिती शिंदे, आमदार, काँग्रेस

अधिकार्‍यांना केंद्रातील भाजप सरकारचा पाठिंबा असून त्याविना हे होऊ शकत नाही, असा आरोप काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी विरोधकांवर केला.

मुंंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचे अन्वेषण व्हावे, यासाठी न्यायालयात याचिका

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्या गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदी कार्यरत असलेले परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे प्रतिमास १०० कोटी रुपयांची वसुली मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे.