तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजपासून २ दिवसांचा कोकणदौरा !
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २१ आणि २२ मे असे २ दिवस कोकणचा दौरा करणार आहेत.
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २१ आणि २२ मे असे २ दिवस कोकणचा दौरा करणार आहेत.
वादळीवार्यासह पावसाची शक्यता. राज्यातील सहस्रावधी बांधकामांची पडझड ! जहाजात अडकलेल्या १३७ प्रवाशांना सुरक्षित हालवले ! ‘मुंबई हाय’जवळ ओ.एन्.जी.सी. कर्मचार्यांच्या निवासस्थानाची जागा बुडाली; ९६ जण बेपत्ता !
‘फॅमिली डॉक्टरां’नी शासनासमवेत यावे. कुटुंबप्रमुख म्हणून मी आज आपल्याला साद घालत आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य आपण उचलावे. तुम्ही लढाईत उतरलात, तर कोरोनाला महाराष्ट्रातून हद्दपार करू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि इतिहासाची साक्ष देणार्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचे जतन अन् संवर्धन व्हावे, यासाठी १५ मे या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्गप्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत ‘ऑनलाईन’ बैठक घेतली.
तौते चक्रीवादळाचा धोका पश्चिम किनारपट्टीवर वाढल्याने केरळ आणि तमिळनाडू राज्यांना केंद्रीय जल आयोगाकडून अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. या दोन्ही राज्यांच्या किनारी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात चालू असलेल्या कोरोनावरील लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री तेथे पोचले होते; मात्र तेथे त्यांनी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेतली.
तुमचा त्याग आणि समर्पण यांना मानाचा मुजरा आहे. तुमचे हे योगदान जग कदापि विसरणार नाही, अशा शब्दांत राज्यांतील परिचारिकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गौरव केला.
‘जनसेवेमध्ये मग्न असणारे बारमालक, मद्य विक्रेते यांना मालमत्ता कर, विजेचे देयक, अबकारी कर यांमध्ये सवलत देण्याची मागणी करण्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
राष्ट्रपुरुष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सामाजिक माध्यमावर अपकीर्ती केल्याप्रकरणी पुण्यातील सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.
पुण्यासह ज्या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत आहे, अशा ठिकाणी दळणवळण बंदी लागू करा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. ‘आम्हाला आदेश द्यायला लावू नका’, असेही न्यायालयाने या वेळी म्हटले आहे.