बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !
देशात पुरो(अधो)गाम्यांच्या हत्या झाल्यावर देशातील सर्वच राजकीय पक्ष आवाज उठवतात; मात्र हिंदुत्वनिष्ठांच्या किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्यावर कुणीही बोलत नाहीत, हा त्यांचा ढोंगीपणाच होय !
देशात पुरो(अधो)गाम्यांच्या हत्या झाल्यावर देशातील सर्वच राजकीय पक्ष आवाज उठवतात; मात्र हिंदुत्वनिष्ठांच्या किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्यावर कुणीही बोलत नाहीत, हा त्यांचा ढोंगीपणाच होय !
बंगाल म्हणजे गावठी बॉम्ब बनवण्याचा मोठा कारखाना झाला असून त्याच्या निर्मितीमध्ये तृणमूल काँग्रेसचेच नेते आणि कार्यकर्ते पुढे आहेत, अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत; मात्र याविरोधात स्थानिक पोलीस आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा कृती का करत नाही ?
नंदीग्राम येथे प्रचार करत असतांना एका लहान अपघातात ममता बॅनर्जी यांच्या पायाचा अस्थीभंग झाल्याने पुढील दीड मास त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
बंगालचे धर्मांध मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी हे हेतूपुरस्सर असे वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. केंद्रसरकारने संपूर्ण देशात गोहत्याबंदी केली, तरच सिद्दीकुल्लाह यांच्यासारखे धर्मांध वठणीवर येतील !
तृणमूल काँग्रेसने दक्षिण २४ परगणामधील भानगर भागातील इच्छुक नेते अराबूल इस्लाम यांना विधानसभेच्या निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्याच कार्यालयाची जाळपोळ केली.
बंगालमधील मंत्री अशा प्रकारची धमकी देतात, याचा अर्थ तेथे तृणमूल काँग्रेसची हुकूमशाही आहे ! याविरोधात लोकशाहीचे तथाकथित पुरस्कर्ते असणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी पक्ष, संघटना, बुद्धीवादी तोंड उघडत नाहीत !
बंगाल राज्याच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील रामपूर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांवर अज्ञातांनी केलेल्या बॉम्बच्या आक्रमणात ६ कार्यकर्ते गंभीररित्या घायाळ झाले आहेत.
तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हाकिम यांचे मशिदीमधून आश्वासन : हिंदु नेते कधी ‘पुरोहित, पुजारी यांना मानधन देऊ’ किंवा ‘असलेले मानधन वाढवू’, असे आश्वासन देत नाहीत; त्यांची मतपेढी नाही, हे लक्षात घेऊन हिंदूंनी त्यांची मतपेढी निर्माण करावी !
बहुसंख्यांक असलेल्या हिंदु समाजाचा विचार केल्यास आपल्याकडे #HinduLivesMatter या नावाने मोहिमा, आंदोलने, ऑनलाईन अभियान राबवावी लागतात. एकंदरीत, या तीनही राज्यांतील हिंदूंनी भारतीयत्वाच्या रक्षणार्थ स्वतःचे मत देणे, ही काळाची निकड आहे. त्यासाठी त्यांनी कंबर कसायला हवी, हेच खरे !
येथील मैदानात २२ फेब्रुवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मैदानात जाऊन गंगाजल शिंपडून त्याचे ‘शुद्धीकरण’ केले. तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप यादव यांच्या नेतृत्वाखाली हे शुद्धीकरण करण्यात आले.