बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे बंद महाविद्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ११ संगणक पळवले !

सरस्वती विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय गावाबाहेर आहेत. २४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत संगणक कक्ष बंद होते. याचा अपलाभ घेत अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून ही चोरी केल्याचे समोर आले आहे.

सांगलीतील ‘बी.एस्.एन्.एल्.’च्या तार चोरी प्रकरणी महापालिकेतील नगरसेवकाचा सहभाग ! – दीपक माने, सरचिटणीस, भाजप

असे लोकप्रतिनिधी जनतेला काय न्याय देणार ? भ्रष्ट लोकप्रतिनिधींना त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक !

धर्माबाद (नांदेड) येथील श्रीराम मंदिरातील प्राचीन मूर्ती आणि दागिने चोरट्याने परत पाठवले !

२३ दिवसांनी चोरट्याने स्वत:हून चोरलेल्या मूर्ती आणि दागिने पार्सलने मंदिरातील पुजार्‍यांच्या घरी परत पाठवले. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

कैमूर (बिहार) येथे रेल्वे पोलीस ठाण्याच्या आवारातील श्री महाकालीदेवीच्या मंदिरात चोरी !

रेल्वे पोलीस ठाण्याच्या आवारात चोरटे चोरी करतात, हे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस रेल्वेच्या संपत्तीचे कसे संरक्षण करत असतील, याची कल्पानाच करता येत नाही !

हरियाणातील मुसलमानबहुल भागात धर्मांध चोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण

देशातील बहुतेक मुसलमानबहुल भागांमध्ये आरोपींना पकडण्यास गेल्यावर पोलिसांवर आक्रमणे होत असून ही एक ‘राष्ट्रीय समस्या’ आहे. ही समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

पुणे येथे ए.टी.एम्. फोडणारी टोळी जेरबंद !

सोलापूर रस्त्यावरील यवत येथील महाराष्ट्र बँकेचे (अधिकोष) ए.टी.एम्. कापून चोरट्यांनी २३ लाख ८० सहस्र ७०० रुपयांची चोरी केली.

लातूर येथे पोलिसांनी जप्त केलेल्या सव्वा कोटी रुपयांच्या गुटख्याची चोरी !

पोलिसांच्या निष्क्रीयतेचे आणि दायित्वशून्य कामाचे उदाहरण !

केरळमधील श्री षण्गुमुगम्देवी मंदिरातील देवीच्या दागिन्यांची देवस्वम् मंडळाच्या अधिकार्‍यांकडूनच चोरी !  

मंदिराचे सरकारीकरण झाल्यामुळेच देवस्वम् मंडळात भ्रष्ट अधिकार्‍यांचा समावेश होतो. हे टाळण्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती द्या !

महाळुंगे पडवळ (पुणे) येथील श्री कमलजादेवी मंदिराच्या ‘शटर’चे कुलूप तोडून चांदीच्या पादुकांची चोरी !

कळंब येथील आदिशक्ती श्री कमलजादेवी माता मंदिराच्या ‘शटर’चे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी चांदीच्या पादुका चोरून नेल्या आहेत. १३ जानेवारीच्या पहाटे चोरीची घटना चालू असतांना सायरन वाजल्याने चोर घाबरून पळून गेले.

बुंदेलखंड (उत्तरप्रदेश) येथील मंदिरातून चोरी झालेली देवीची प्राचीन मूर्ती इंग्लंडच्या बागेत !

मकरसंक्रातीच्या निमित्ताने भारताकडे मूर्ती सुपुर्द !
भारतातील देवतांच्या प्राचीन मूर्तींची तस्करी होणे, हे पुरातत्व विभागाला लज्जास्पद !