केरळमधील श्री षण्गुमुगम्देवी मंदिरातील देवीच्या दागिन्यांची देवस्वम् मंडळाच्या अधिकार्‍यांकडूनच चोरी !  

मंदिराचे सरकारीकरण झाल्यामुळेच देवस्वम् मंडळात भ्रष्ट अधिकार्‍यांचा समावेश होतो. हे टाळण्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती द्या ! – संपादक

श्री षण्गुमुगम्देवी मंदिर

थिरूवनंतपूरम् – येथील श्री षण्गुमुगम्देवी मंदिरातील देवीचे दागिने त्रावणकोर देवस्वम् मंडळाच्या अधिकार्‍यांनी चोरल्याच्या वृत्ताला देवस्वम् मंडळाच्या दक्षता अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे. देवस्वम् मंडळाच्या दक्षता अधिकार्‍यांनी या प्रकरणी अहवाल सादर केला असून या अहवालानुसार दागिने चोरणार्‍या ३ अधिकार्‍यांच्या विरोधात फौजदारी खटला प्रविष्ट करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.

देवीचे दागिने हे एका बंदिस्त खोलीमध्ये ठेवले जातात. देवीच्या उत्सवाच्या वेळी ते बाहेर काढले जातात. १४ सप्टेंबर २०२१ मध्ये या खोलीचे द्वार उघडण्यात आले. त्या वेळी देवीचे काही दागिने गहाळ झाल्याचे लक्षात आले. ‘या खोलीच्या रक्षणाचे दायित्व ज्या अधिकार्‍याकडे आहे, त्याला या प्रकरणात उत्तरदायी धरावे’, अशी दक्षता अधिकार्‍यांकडे मागणी करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी केली असता ३ अधिकार्‍यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.