कैमूर (बिहार) येथे रेल्वे पोलीस ठाण्याच्या आवारातील श्री महाकालीदेवीच्या मंदिरात चोरी !

चोरी करण्यापूर्वी चोरांनी ७ कुत्र्यांना विष देऊन मारले !

  • रेल्वे पोलीस ठाण्याच्या आवारात चोरटे चोरी करतात, हे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस रेल्वेच्या संपत्तीचे कसे संरक्षण करत असतील, याची कल्पानाच करता येत नाही ! – संपादक
  • बिहारमधील जंगलराज अद्याप संपलेले नाही, असेच ही घटना दर्शवते ! – संपादक
मंदिरातील तोडलेली दानपेटी

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या कैमूर येथे श्री महाकालीदेवीच्या मंदिरात चोरी करण्यासाठी चोरांनी तेथील ७ भटक्या कुत्र्यांना विष देऊन ठार केले. त्यानंतर मंदिरातील दानपेटी तोडून त्यातील सुमारे १५ ते २० सहस्र रुपयांची चोरी केली. ठार करण्यात आलेले कुत्रे मंदिरामधील आरतीनंतर मिळणार्‍या प्रसादासाठी येथे येत असतात. विशेष म्हणजे हे मंदिर येथील रेल्वे गोदामाजवळील रेल्वे पोलीस ठाण्याच्या आवारात आहे.