|
|
नूंह (हरियाणा) – येथील मुसलमानबहुल तावडू भागाध्ये धर्मांधांकडून पोलिसांवर आक्रमण करण्यात आल्याची घटना घडली आहे. एटीएम् लूटल्याच्या प्रकरणातील आरोपी तस्लिम याला पकडण्यासाठी पोलीस येथे गेले होते. या वेळी महिला पोलीस निरीक्षकाची वर्दी फाडण्यात आली. या वेळी पोलिसांनी पकडलेल्या तस्लिम यालाही धर्मांधांनी सोडवून नेले. १८ सप्टेंबर २०२१ या दिवशी राज्यातील गुरुग्राम येथील धनकोट भागाममध्ये असलेले एक एटीएम् ४ जणांनी लुटले होते. या वेळी त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला होता. या चार जणांमध्ये तस्लिम याचा समावेश होता.
ATM लुटेरा तस्लीम को पकड़ने गई गुरुग्राम पुलिस पर मेवात में हमला, महिला पुलिसकर्मी की वर्दी फाड़ी#Mewat #HaryanaPolice https://t.co/UiYyt6SPl3
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 30, 2022
१. पोलीस तावडू भागात तस्लिम याच्या घरी पोचले आणि त्याला अटक केली. त्या वेळी त्याची आई, वडील, पत्नी आणि बहीण, तसेच अन्य धर्मांध यांनी महिला पोलीस निरीक्षक रीना यांना मारहाण करण्यास चालू केले. त्यांचे ओळखपत्र खेचून घेतले. या मारहाणीच्या वेळी तस्लिम तेथून पळून गेला. तस्लिमची आई, वडील, पत्नी आणि बहीण या चौघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
२. मुसलमानबहुल नूंह जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मार्च २०१८ मध्ये बावला गावामध्ये रफीक या चोराला शोधण्यासाठी पोलीस गेले असता त्यांवर आक्रमण करण्यात आले होते. या वेळी पोलीस अधीक्षकांच्या गाडीवर डंपर चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.