गाजीपूर (उत्तरप्रदेश) येथील श्रीरामाच्या मंदिरातील ३ मूर्तींची चोरी !

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांची मंदिरे असुरक्षित असणेे हिंदूंसाठी लज्जास्पद !

पुण्यात सनबर्न होळीच्या पार्टीत तरुण-तरुणींचे मद्यप्राशन करून बेधुंद नृत्य !

देशाच्या युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्‍या आणि हिंदूंच्या सणांचे पावित्र्य भंग करणार्‍या ‘सनबर्न’ आणि अशा प्रकारच्या महोत्सवांचे आयोजन करणार्‍यांना कुणाचा पाठिंबा आहे, हेही पुढे आले पाहिजे !

कुरकुंभ (पुणे) औद्योगिक वसाहतीतून साडेपाच कोटींचे केमिकल चोरीला !

कुरकुंभ, पुणे येथील औद्योगिक वसाहतीमधील ‘इटर्निस फाईन केमिकल’ या आस्थापनामधून २० किलो ‘रोडियम ऑन अल्युमिना’ नावाचे ५ कोटी ४७ लाख २० सहस्र ३४५ रुपयांचे केमिकल चोरीला गेले आहे.

तमिळनाडूच्या मंदिरातून १० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली भगवान हनुमानाची प्राचीन मूर्ती ऑस्ट्रेलियातून भारतात परत आणणार

९ एप्रिल २०१२ या दिवशी तमिळनाडूतील अरियालुर जिल्ह्यातील वेल्लूर गावातील वर्धराजा पेरूमल मंदिरातून ही मूर्ती चोरण्यात आली होती.

खारघर येथील इस्कॉन मंदिरात चोरी करणार्‍या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक !

३१ जानेवारीच्या रात्री इस्कॉन मंदिरातील दानपेटी फोडून ८० सहस्र रुपयांची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी ओवागाव कॅम्प परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

अलवर (राजस्थान) येथे  १ कोटी रुपये मूल्याचे भ्रमषभाष संच चोरणार्‍या धर्मांधांच्या टोळीला अटक

देशात अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य आहेत, हे लक्षात घ्या !

बिहारमधून चोरी झालेली भगवान बुद्धांची मूर्ती इटलीकडून भारताला परत !

बिहारच्या कुंडलपूर बौद्ध मंदिरातून वर्ष २००० मध्ये चोरण्यात आलेली पाषणापासून बनवलेली भगवान बुद्धांची ‘अवलोकितेश्‍वर पद्मपाणि’ मूर्ती इटलीमधील भारतीय दूतावासाकडे सोपवण्यात आली आहे.

वणीत खाणीतून कोळसा चोरणार्‍या १० दरोडेखोरांना अटक !

उकणी कोळसा खाणीत १३ दरोडेखोरांनी २ ट्रक घेऊन दहशत निर्माण करत कोळसा लुटला. त्यानंतर शिरपूर पोलिसांच्या साहाय्याने वणी पोलिसांनी १० दरोडेखोरांना अटक करून दोन्ही हायवा ट्रक जप्त केले.

जालना येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातून बाळाला पळवून नेणार्‍या महिलेस पोलिसांनी पकडले !

सध्या जिल्हा स्त्री रुग्णालयात ९ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असून आणखी ३ कॅमेरे लावणार आहोत, तसेच सुरक्षा रक्षकांनाही सतर्क रहाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

जालना येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरक्षारक्षक नसल्याने अज्ञात महिलेने बाळ चोरून नेले !

आरोग्यमंत्री आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यातच जिल्हा रुग्णालयाची अशी स्थिती असेल, तर इतरत्र कसे असेल ?