हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! – संपादक
नांदेड – काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील धर्माबादपासून जवळ असणार्या श्रीराम मंदिरातून कोट्यवधी रुपये मूल्याच्या प्राचीन मूर्ती आणि दागिने चोरीला गेले होते. २३ दिवसांनी चोरट्याने स्वत:हून चोरलेल्या मूर्ती आणि दागिने पार्सलने मंदिरातील पुजार्यांच्या घरी परत पाठवले. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. हा मौल्यवान ऐवज कुणी पाठवला, याचा तपास चालू आहे.