पुणे – सोलापूर रस्त्यावरील यवत येथील महाराष्ट्र बँकेचे (अधिकोष) ए.टी.एम्. कापून चोरट्यांनी २३ लाख ८० सहस्र ७०० रुपयांची चोरी केली. पोलीस पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये पडताळणी केली असता एका मोटारसायकलमागे गॅस सिलेंडर लावलेला दिसून आला. त्यावरून अजय शेंडे, शिवाजी गरड आणि ऋषिकेश किरतिके या तिघांना कह्यात घेतले, तर त्यांचे २ साथीदार पळून गेले. त्यांनी यवत, कुरकुंभ आणि लातूर येथे ए.टी.एम्. चोरी, तर वाशीम येथे घरफोडी केल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपींनी ‘यूट्यूब’ या वाहिनीवरून घरफोडी आणि ए.टी.एम्. चोरी कशी करायची याची माहिती गोळा केली. त्यासाठी लागणारे साहित्य ऑनलाईन मागवल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे.