दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : वर्सोवा – विरार सागरी सेतूला विरोध ; उड्डाणपुलांच्‍या खाली अत्याधुनिक विकास ! …

वर्सोवा – विरार सागरी सेतू प्रकल्पामुळे किनार्‍यालगतचे कोळीवाडे आणि मासेमारी व्यवसाय कायमस्वरूपी बाधित होणार आहेत.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुलीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून चोरी !; गृहरक्षकाकडून मारहाण; एकाचा मृत्यू !..

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ चोरांनी घरात एकट्या असलेल्या मुलीचे हात-पाय बांधून तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. घरातून रोख रक्कम आणि मंगळसूत्र चोरून नेले आहे.

भ्रमणसंगणक चोरणार्‍या आरोपीला अटक !

अशा चोरांना कठोर शिक्षा केल्याविना चोरीच्या घटना थांबणार नाहीत !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप :माजी कुलगुरूंना मारहाण करणार्‍यांवर गुन्‍हा नोंद; निकृष्‍ट जेवण देणार्‍या कंत्राटदारांना ५ लाख रुपये दंड होणार !…

मुंबई ते साईनगर शिर्डीदरम्‍यान धावणार्‍या ‘वंदे भारत’ रेल्‍वेगाड्यांमध्‍ये निकृष्‍ट दर्जाचे जेवण मिळत होते. रेल्‍वेने याची गंभीर नोंद घेतली असून दोषी कंत्राटदारांना ५ लाख रुपयांपर्यंत कमाल दंड होणार आहे. आतापर्यंत दंडाची रक्‍कम २५ सहस्र रुपये होती.

मुंबईत घरात काही न मिळाल्‍याने शिरस्‍त्राणाची चोरी !

ओशिवरा पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील एका घरात चोर शिरले होते; पण त्‍यांना तेथे काहीच न मिळाल्‍याने त्‍यांनी तेथील एका दुचाकीवरील शिरस्‍त्राण चोरले. हे दृश्‍य सीसीटीव्‍ही कॅमेर्‍यात दिसत आहे.

नीरा (जिल्‍हा पुणे) येथे पोलीसच निघाला अट्टल दुचाकीचोर !

पोलीस खात्‍यात अशा पोलिसांचा भरणा असल्‍यास गुन्‍हेगारी वाढली नाही तरच नवल ! यातून नोकरी देतांना शिक्षणासह व्‍यक्‍तीचे गुणही का पाहिले पाहिजेत, ते लक्षात येते.

खोडद (नारायणगाव) येथे देवजाळीमाता मंदिरातून दानपेटीची चोरी !

नारायणगाव (ता. जुन्नर) येथील देवजाळीमाता देवीच्या मंदिरातून १४ नोव्हेंबरला मध्यरात्री चोरांनी दानपेटी चोरून नेली. याविषयी ग्रामस्थांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

५० वर्षांपूर्वी चोरण्यात आलेल्या देवतांच्या ८ व्या शतकातील २ मूर्ती लंडन येथे भारताकडे सुपुर्द !

भारतातून चोरण्यात आलेल्या देवतांच्या ८ व्या शतकातील २ मूर्ती येथे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या उपस्थितीत पुन्हा भारताकडे सुपुर्द करण्यात आल्या.

Burglary and bike theft : गोव्यात ६ घरफोड्या अन् दुचाकी चोरीच्या प्रकरणी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खेळाडू आणि त्याचा साथीदार कह्यात

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ‘स्नूकर’ खेळात गोव्याचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू सुलेमान शेख आणि त्याचा साथीदार शब्बीरसाहेब शब्दावली यांना पोलिसांनी घेतले कह्यात !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुंबईत फटाके फोडण्‍याची वेळ रात्री ८ ते १० !; नाशिक येथे ३९७ किलो बनावट पनीर !…

९७ किलो बनावट पनीर अन्‍न आणि औषध प्रशासनाने हस्‍तगत केले आहे. या पनीरचे मूल्‍य ८४ सहस्र रुपयांहून अधिक आहे. बनावट पनीरचे नमुने विश्‍लेषणासाठी पाठवण्‍यात आले असून बाकी साठा नष्‍ट करण्‍यात आला आहे.