भ्रमणसंगणक चोरणार्‍या आरोपीला अटक !

मुंबई – उपाहारगृहातून भ्रमणसंगणक (लॅपटॉप) चोरून पळून जाणारा आरोपी अजयकुमार सक्सेना (वय ३८ वर्षे) याला घाटकोपर पोलिसांनी अटक केली. अटक केलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत चोरीचे अनेक गुन्हे नोंद आहेत.

संपादकीय भूमिका

अशा चोरांना कठोर शिक्षा केल्याविना चोरीच्या घटना थांबणार नाहीत !