खोडद (नारायणगाव) येथे देवजाळीमाता मंदिरातून दानपेटीची चोरी !

(प्रतिकात्मक चित्र)

खोडद (जिल्हा पुणे) – नारायणगाव (ता. जुन्नर) येथील देवजाळीमाता देवीच्या मंदिरातून १४ नोव्हेंबरला मध्यरात्री चोरांनी दानपेटी चोरून नेली. याविषयी ग्रामस्थांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. येथील ग्रामस्थांनी सांगितले की, देवजाळी मळ्यात अष्टविनायक महामार्गालगत भरवस्तीत देवजाळीमाता मंदिर आहे. चोरांनी मंदिराच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून तेथील दानपेटी आणि किरकोळ साहित्य चोरून नेले.

संपादकीय भूमिका 

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !