वर्सोवा – विरार सागरी सेतूला विरोध
मुंबई – वर्सोवा – विरार सागरी सेतू प्रकल्पामुळे किनार्यालगतचे कोळीवाडे आणि मासेमारी व्यवसाय कायमस्वरूपी बाधित होणार आहेत. मच्छीमार आणि मासेमार संघटना यांना विश्वासात न घेता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम्.एम्.आर्.डी.ए.) हा प्रकल्प राबवत असल्याचा आरोप करत वर्सोवा – मनोरी दरम्यानच्या ११ मासेमार संघटनांनी या सागरी सेतूला विरोध केला आहे.
उड्डाणपुलांच्या खाली अत्याधुनिक विकास !
मुंबई – येथील उड्डाणपुलांच्या खाली होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी, तसेच त्या भागाच्या सौंदर्यीकरणासाठी पालिकेने तेथे ‘हायटेक विकास’ करण्याचा विचार चालू केला आहे. त्याचा पायलट प्रोजेक्ट भायखळा येथील सर जे.जे. उड्डाणपूल येथे चालू होणार आहे. पालिकेचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास मुंबईतील इतर पुलांखालील मोकळ्या जागांवर अशाच प्रकारचा विकास करण्याचे विचाराधीन आहे.
ट्रकचालकाला लुटले !
जळगाव – नशिराबाद पथकर नाक्याजवळ मध्यरात्री साडेबारा वाजता ट्रकचा पाठलाग करत दुचाकीस्वारांनी अडवले. दमदाटी करत चालकाच्या खिशातून २ सहस्र रोख आणि ‘गूगल-पे’ने १९ सहस्र असे एकूण २१ सहस्र रुपये हिसकावून पळ काढला. या प्रकरणी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अशा चोरांना अटक करावी !
अवेळी पावसामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली !
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून बिघडलेली मुंबईतील हवेची गुणवत्ता अवेळी पडलेल्या पावसामुळे सुधारली आहे. याआधी बांधकामातून होणारे प्रदूषण आणि दिवाळीत फोडले गेलेले फटाके यांमुळे मुंबईतील हवेचा दर्जा घसरला होता. पुढील ३ – ४ दिवस मुंबईतील हवेची गुणवत्ता चांगल्या स्थितीत रहाणार आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्याला अटक
मुंबई – अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ४४ वर्षीय आरोपीला वाकोला पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी वाकोला पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. १५ वर्षीय मुलगी एकटीच घरी असल्याचे पाहून त्याने वरील प्रकार केला.
अशा वासनांधांना कठोर शिक्षाच हवी !
कुत्र्यावर गोळीबार !
पुणे – शेजार्यांचा कुत्रा सतत भुंकून त्रास देत असल्याने त्याच्यावर ‘स्पोर्टस् गन’मधून गोळीबार करणार्या अली रियाज थावेर याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी कुत्र्याच्या मालकाने तक्रार केली होती.