कोरोनाचा कहर

जेव्हा स्थुलातील प्रयत्न न्यून पडतात, तेव्हा सूक्ष्मातील प्रयत्न करावे लागतात. विविध संप्रदायांनी त्यांच्या उपासकांना देवाची भक्ती करण्यास सांगितले. औषधांसमवेत प्रार्थना आणि नामजप आदी उपाय केल्याने कोरोनापासून त्यांचे रक्षण झाले. याची नोंदही प्रशासनाने घेण्याची आज वेळ आली आहे !

कोरोनामुळे १५ ते १७ एप्रिल या कालावधीत कनिष्ठ न्यायालयाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कनिष्ठ न्यायालये, औद्योगिक न्यायालये, उच्च न्यायालयाच्या अंतर्गत काम करणारे लवाद इत्यादींचे कामकाज १५ ते १७ एप्रिल या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गोव्यातील खाण व्यवसाय, २ जी स्पॅक्ट्रम्, कोळसा खाण आदींविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय चुकीचे ठरले ! – हरिश साळवे, वरिष्ठ अधिवक्ता

जे लोक निवडून येत नव्हते, ते सार्वजनिक जनहित याचिका प्रविष्ट करून सरकारकडून स्वत:चे हित साध्य करत होते. अशांना आता चपराक बसली आहे.

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण आणि उत्खनन करण्यास न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार !

काशी विश्‍वनाथ मंदिरासमोरील ज्ञानवापी मशिदीचे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण आणि उत्खनन करण्यास वाराणसी जलदगती न्यायालयाने अनुमती दिली. त्यानंतर मुसलमानांच्या संघटना आणि नेते यांच्याकडून प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ११.४.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

अमरावती महापालिकेचे माजी मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड यांना अटक

२ कोटी ४९ लाख रुपयांचे शौचालय अपहार प्रकरण. महापालिकेचे माजी मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २ कोटी ४९ लाख रुपयांच्या शौचालय अपहार प्रकरणी ८ एप्रिल या दिवशी अटक केली.

आता सत्य जगासमोर येईल !

श्री काशी विश्‍वनाथ मंदिराच्या भूमीवर असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या अतिक्रमणाच्या प्रकरणी वाराणसी जलदगती न्यायालयाने पुरातत्व विभागाला सर्वेक्षण आणि उत्खनन करण्याची अनुमती दिली आहे.

भाषण स्वातंत्र्याद्वारे दुसर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावता येत नाहीत ! – अलाहाबाद उच्च न्यायालयाचे लखनौ खंडपीठ

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या महंमद नदीम या कार्यकर्त्याला फटकारत त्याचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला.

चारचाकी गाडीमध्ये एकटे असतांनाही मास्क वापरणे बंधनकारक ! – देहली उच्च न्यायालयाचा आदेश

चारचाकी वाहनातून एकट्याने प्रवास करत असतांनाही मास्क वापरणे बंधनकारक आहे, असा निर्णय देहली उच्च न्यायालयाने दिला आहे. ‘करोनाचा प्रसार रोखण्यात मास्क हे सुरक्षा कवचासारखे आहे.

न्यायमूर्ती एन्.व्ही. रमन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश !

भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नथालापती वेंकट रमन्ना हे विराजमान होणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावाला संमती दिली आहे.