न्यायमूर्ती एन्.व्ही. रमन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश !

नथालापती वेंकट रमन्ना

नवी देहली – भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नथालापती वेंकट रमन्ना हे विराजमान होणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावाला संमती दिली आहे.

२४ एप्रिलला न्यायमूर्ती रमन्ना सरन्यायाधीशपदाची शपथ घेतील. विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी न्यायमूर्ती रमन्ना यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. न्यायमूर्ती रमन्ना यांनी याआधी देहली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि आंध्रप्रदेशच्या उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले आहे