संच मान्यतेच्या सुधारित निकषाअन्वये पटसंख्या न्यून झाल्यास मुख्याध्यापकांचे पद रहित होणार !

खासगी शाळांना शासनमान्यतेविना नवीन शिक्षक संमती मिळत नाही. निवृत्त शिक्षकांची नियुक्ती ही नवीन शिक्षकांची भरती होईपर्यंतच असेल. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.

शिक्षकांच्या वस्त्रसंहितेला पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध !

विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे जर शिक्षकाची वेशभूषा ही अशोभनीय असेल, तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो. ही गोष्ट लक्षात घेऊन शिक्षण विभागाने राज्यातील सर्व  शिक्षकांसाठी नवीन वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे

‘आगाशे विद्यामंदिर’ने आता राज्यातही यश मिळवावे ! –  डॉ. परकार

सातत्यपूर्ण उपक्रम, उत्कृष्ट नियोजन, अच्युतराव पटवर्धन आणि जोग सरांची उच्चतम शैक्षणिक गुणवत्ता, कार्यानुभव, शालेय सुंदर परिसर, बालमनावरील संस्कार यांमुळे शाळेला यश मिळाले.

Maharahstra Teacher Dress Code : महाराष्‍ट्रात शालेय शिक्षकांसाठी वस्‍त्रसंहिता लागू !

शिक्षण विभागाचा अभिनंदनीय निर्णय ! मंदिरांत वस्‍त्रसंहिता लागू झाल्‍यावर कोल्‍हेकुई करणार्‍यांना याविषयी काय म्‍हणायचे आहे ?

विद्यार्थ्यांसाठीचे जागतिक स्तरावरील गृहपाठ धोरण स्वीकारण्याची आवश्यकता ! – राज्यपाल रमेश बैस

जगातील अनेक राष्ट्रांत विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जात नाही, आपणही हे धोरण स्वीकारण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी शाळेतच अभ्यास करून घ्यावा, असे मत राज्यपाल रमेश बैस..

जिल्हा परिषद शिक्षकांची अद्यापही ९८६ पदे रिक्त

जिल्ह्यातील शिक्षक भरती गेली अनेक वर्षे रखडली होती. आंतरजिल्हा स्थानांतरामुळे शिक्षकांची संख्याही प्रतीवर्षी वाढत होती. शिक्षक अल्प असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत होती.

Pakistan Hindu Teacher Acquitted : हिंदु शिक्षकाची ईशनिंदा प्रकरणी निर्दोष मुक्तता !

उच्च न्यायालयाने तरी तत्त्वनिष्ठपणे हिंदूंच्या बाजूने निकाल दिला. असे असले, तरी हा हिंदु प्राध्यापक उद्या कारागृहातून बाहेर आल्यावर सुरक्षित जीवन जगू शकेल का, हा प्रश्‍न अनुत्तरितच रहाणार !

Bilaspur Teacher Video : बिलासपूर (छत्तीसगड) येथील सरकारी शाळेत दारू पिणारा शिक्षक निलंबित !

जे शिक्षक स्वतःच व्यसनी आहेत, ते विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशांना अटक करून कारागृहात टाकले पाहिजे !

कोपरगाव (अहिल्यानगर) येथील महाविद्यालयात प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना नमाजपठण करायला लावले !

एरव्ही भगवद्गीता, योगासने शिकवण्याचा कुणा शाळेने निर्णय घेतला, तर पुरो(अधो)गामी जमात ‘शिक्षणाचे भगवेकरण’ होत असल्याची आरोळी ठोकतात. आता मात्र यांपैकी कुणीही चकार शब्द काढत नाही, हे जाणा !

हडपसर (पुणे) येथे शाळकरी मुलींसमवेत अश्लील कृत्य करणार्‍या शिक्षकाला ३ वर्षांचा कारावास !

शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी न्यायालयाने कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या राठोड या शिक्षकाला ३ वर्षे साधा कारावास आणि २ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी याविषयीचे आदेश दिले आहेत.