अफगाणिस्तानात महिला वृत्तनिवेदिकांना तोंडवळा झाकण्याचा तालिबानी आदेश !

स्त्रीमुक्तीची चळवळ राबवणारे हिंदूंच्या परंपरांना नेहमीच नावे ठेवतात; परंतु तालिबानच्या स्त्रीविरोधी कृत्यांकडे मात्र कानाडोळा करतात !

अफगाणिस्तानात तालिबानच्या विरोधात उठाव : ३ जिल्ह्यांवर विद्रोह्यांचे नियंत्रण

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवटीच्या विरोधात सशस्त्र उठाव करण्यात आला आहे. अहमद मसूद यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या विद्रोह्यांनी ‘राष्ट्रीय प्रतिकार दल’ सिद्ध केले असून हे दल तालिबान्यांवर तुटून पडले आहे.

अफगाणिस्तानमधील बाँबस्फोटांत ३० जण ठार

२९ एप्रिल या दिवशी २ वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बाँबस्फोटांत ३० जण ठार, तर अनेक जण घायाळ झाले. यांतील एक बाँबस्फोट एका मशिदीत नमाजपठणाच्या वेळी झाला. यात २० जण ठार झाले. दुसरा स्फोट एका घरात झाला.

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान !

‘आतंकवाद पोसल्यावर काय होते ?’, याचे हे उत्तम उदाहरण होय. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’, असे म्हटले जाते. भारतासाठी तालिबान आणि पाकिस्तान हे एकाच माळेचे मणी आहेत. या दोघांनाही कुणी धडा शिकवत असेल, तर ते भारताला हवेच आहे आणि हे दोन्ही देश जर पुढे एकमेकांशी भांडत राहिले, तर तेही भारताला हवेच आहे !

आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका ! – तालिबानची पाकला चेतावणी

पाकने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या ‘एअर स्ट्राइक’चे प्रकरण

अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून अफूची शेती करण्यावर बंदी !

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारकडून अफूच्या शेतीवर बंदी घालण्यात आली आहे. येथील अफूचा जगभरात पुरवठा होतो. या दिवसांत संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये अफूची शेती करण्यास आरंभ होतो. त्या पार्श्‍वभूमीवर तालिबानने वरील चेतावणी दिली आहे.

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची अपयशी कारकीर्द !

महागाई ! अन्नधान्य, दूध, खाण्याचे सर्व पदार्थ, तसेच बांधकाम उद्योग यांच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानमधून लाखो शरणार्थी पाकिस्तानमध्ये शरण आले आहेत. लोकांना महागाई अल्प आणि हाताला काम पाहिजे असते. तसे काहीही झाले नाही. त्यामुळे पाकिस्तानी जनता सरकारच्या विरोधात गेली आहे.

तालिबानकडून महिलांनी एकट्याने विमान प्रवास करण्यावर प्रतिबंध !

भारतात शाळांमध्ये हिजाबवर बंदी घातल्यावर ‘मुसलमान स्त्रियांच्या हक्कांवर घाला घातला’, अशी बिनबुडाची टीका करणारे भारतातील पुरो(अधो)गामी यांना ‘महिलांच्या हक्कांवर गदा आणणे; म्हणजे नक्की काय असते ?’, हे समजून घेण्यासाठी अफगाणिस्तानला पाठवा !

अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीत चालू झालेली मुलींची शाळा अवघ्या काही घंट्यांत बंद !

भारतातील तथाकथित स्त्रीवादी नेत्या, संघटना, मानवाधिकार संघटना याविषयी कधीच तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !

‘रशिया-युक्रेन युद्ध ही पाश्चात्त्य राष्ट्रांना अल्लाने दिलेली शिक्षा !’ – इस्लामिक स्टेट

अफगाणिस्तानमध्ये लोक उपाशी आहेत, तेथे तालिबान्यांच्या राजवटीत लोकांचे हाल होत आहेत. तेथील लोकांना कोण शिक्षा करत आहे, हेही इस्लामिक स्टेटने सांगावे !