अफगाणिस्तानात महिला वृत्तनिवेदिकांना तोंडवळा झाकण्याचा तालिबानी आदेश !

काबुल – अफगाणिस्तानातील महिला वृत्तनिवेदिकांनी कॅमेर्‍यासमोर वृत्त निवेदन करत असतांना स्वत:चा तोंडवळा झाकावा, असा आदेश तालिबानने दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच तालिबानने सर्व महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्याचा आदेश दिला होता. तसे केले नाही, तर त्यांना शिक्षा देण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते.

तालिबानच्या या सातत्याने महिलाविरोधी भूमिकेला सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे.

संपादकीय भूमिका

स्त्रीमुक्तीची चळवळ राबवणारे हिंदूंच्या परंपरांना नेहमीच नावे ठेवतात; परंतु तालिबानच्या स्त्रीविरोधी कृत्यांकडे मात्र कानाडोळा करतात !