महाकुंभ विशेष लेख
सनातन धर्मामध्ये महिलांना देवीच्या रूपात पूजण्याची परंपरा सर्वांत प्राचीन आणि गहन आहे. इथे स्त्रीला केवळ मातृत्वापर्यंत सीमित केलेले नाही, तर तिला शक्ती, ज्ञान आणि भक्ती यांचे प्रतीक मानले गेले आहे. ‘अर्धनारीश्वर’ ही संकल्पना शिव आणि शक्ति यांचे समान स्थान दाखवते. ही संकल्पना पुरुष आणि महिला एकमेकांना पूरक आहेत, हे दर्शवते. या दर्शनाचे कुंभमेळा हे सर्वांत जिवंत उदाहरण आहे, ज्यामध्ये महिलांना धर्म, समाज आणि साधना यांमध्ये समान अधिकार दिले गेले आहेत. याउलट ख्रिस्ती आणि इस्लाम यांच्या अब्राह्मिक परपरांमध्ये महिलांना दुय्यम स्थान दिले आहे. त्यांच्या धर्मशास्त्रामध्ये महिलेला अधिक प्रमाणात पुरुषाच्या अधीन मानले आहे, जी त्यांच्या दार्शनिक आणि सामाजिक चौकटीची मर्यादा दर्शवते.

१. सनातन धर्मामध्ये महिलांचे स्थान : दार्शनिक आणि धार्मिक दृष्टी !
अ. अर्धनारीश्वर : समता आणि पूरकता यांचे प्रतीक आहे. अर्धनारीश्वराची संकल्पना शिव आणि शक्ति, पुरुष अन् महिला हे एकमेकांविना अपूर्ण आहेत, हे दाखवते. स्त्री आणि पुरुष हे सृष्टीचे आधार आहेत. त्यांची समानता आणि सहअस्तित्वच ब्रह्मांडाला सतुंलित करते. अर्धनारीश्वर ही संकल्पना धर्म आणि अध्यात्म यांमध्ये महिलांची भूमिका केवळ आवश्यक नाही, तर पुरुषांच्या बरोबरीची आहे, हे सिद्ध करते.
आ. वैदिक परंपरांमध्ये महिलांचे स्थान : वैदिक काळात महिला या ऋषीही होत्या. त्यांनी वेद आणि उपनिषदे यांच्या रचनेमध्ये भाग घेतला होता. गार्गी हिने याज्ञवल्क्यांसह ब्रह्माच्या गूढ रहस्यांविषयी वादविवाद केला. मैत्रेयी हिने आत्मा आणि मोक्ष यांच्या सिद्धांतावर खोल चिंतन केले. अपाला आणि लोपामुद्रा यांसारख्यांनी ऋवेदातील महत्त्वपूर्ण सूक्तांची रचना केली. सनातन धर्मामध्ये महिलांना ज्ञान, दर्शन आणि साधना यांमध्ये पूर्ण स्वातंत्र्य होते, हे या उदाहरणावरून लक्षात येते.
२. कुंभमेळ्यात महिलांचा भेदभाव न करता सहभाग

अ. कुंभमेळ्यात महिला साध्वींचे स्थान : कुंभमेळा महिलांसाठी आध्यात्मिक समानता आणि स्वातंत्र्य यांचे प्रतीक आहे. महिला साध्वी यांचा संगम स्नान, प्रवचन आणि साधना यांत समान सहभाग असतो. येथे कोणताही जाती किंवा लिंग भेद नाही. संगमावर सर्वांना समान संधी आणि महत्त्व मिळते.
आ. महिला साध्वींचे नेतृत्व आणि योगदान : कुंभमेळ्यामध्ये महिला साध्वी या ध्यान, योग आणि साधना शिबिरांचे संचालन करतात. त्या प्रवचन आणि सत्संग यांच्या माध्यमातून धर्म अन् समाज यांना जागृत करतात.
३. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मातील महिलांची स्थिती
अ. इस्लाम धर्मातील महिलांची स्थिती : इस्लामच्या विविध ग्रंथांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबर मानले जात नाही. कुराणामध्ये महिलांना घराच्या चार भिंतीपर्यंत सीमित रहाण्याचा निर्देश आहे. सार्वजनिक जीवनामध्ये त्यांची भूमिका सीमित आहे. मशिदीमध्ये आणि हजच्या वेळीही महिलांची भूमिका पुरुषांपासून वेगळी अन् सीमित आहे.
आ. ख्रिस्ती धर्मामध्ये महिलांची भूमिका : ख्रिस्ती धर्मामध्ये महिलांना नेहमी पापाचे कारण मानले गेले. ‘बायबल’मध्ये आदम आणि हव्वा यांच्या कथेमध्ये महिलेला पापाच्या उत्पत्तीशी जोडले गेले आहे. चर्चमध्ये महिलांना नेतृत्वाचा अधिकार नाही.
इ. सनातन धर्माच्या तुलनेत सीमित विचार : ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मातील महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिला जात नाही. याउलट सनातन धर्मात महिला या देवी, ऋषि आणि आध्यात्मिक गुरुही होऊ शकते.
४. प्राचीन आणि मध्यकालीन भारतातील महिलांचे योगदान
अ. भक्तीची चळवळ आणि महिला संत
१. संत मीराबाई : संत मीराबाई यांनी भक्ती आणि काव्य यांच्या माध्यमातून श्रीकृष्णाच्या प्रती प्रेमाचा आदर्श दाखवून दिला.
२. अक्का महादेवी : तिने शिवभक्ती आणि त्याग यांचा संदेश दिला.
३. संत जनाबाई : या संत नामदेव यांच्या शिष्या होत्या आणि त्यांनी समाजाला भक्ती अन् सेवा यांचा संदेश दिला.
आ. कुंभमेळा आणि महिला संतांची परंपरा : कुंभमेळ्याच्या माध्यमातून महिला संत आणि साध्वी यांची आध्यात्मिक साधना अन् नेतृत्व या प्रकाश टाकते.
५. कुंभमेळा : दार्शनिक आणि सामाजिक समानतेचे व्यासपीठ
अ. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ यांचा आदर्श : कुंभमेळा ‘वसुधैव कुटुम्बकम् (संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे)’ हा आदर्श साकार करतो. येथे सर्वांना मग तो पुरुष किंवा महिला असो जाती आणि धर्म यांच्या वर जाऊन स्थान मिळते.
आ. महिला साध्वींच्या संगम स्नानाचे महत्त्व : महिला साध्वी संगम स्नानामध्ये भाग घेऊन आध्यात्मिक समानतेचा संदेश देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली लोकांना धर्म आणि समाजातील महिलांची भूमिका लक्षात येते.
६. कुंभमेळ्यामध्ये महिलांचे आधुनिक योगदान
अ. पर्यावरण संरक्षण आणि महिला साध्वी : कुंभमेळ्यामध्ये महिला साध्वी पर्यावरणाच्या संरक्षणाविषयीच्या मोहिमेचे नेतृत्व करतात. त्या नद्यांची स्वच्छता आणि हरित कुंभ यांचा संदेश प्रसारित करतात. महिला साध्वी या शिक्षण आणि समाजसेवा यांच्या माध्यमातून समाजाला सशक्त करतात.
७. निष्कर्ष : सनातन धर्मात महिलांचे अद्वितीय स्थान
सनातन धर्मात महिलांना देवी, ऋषि आणि साध्वी यांचा दर्जा देण्यात आला आहे. कुंभमेळा हा आध्यात्मिकता, ज्ञान आणि सेवा यांचे व्यासपीठ आहे. हे आयोजन सिद्ध करते की, धर्म आणि समाज यांमध्ये महिलांची भूमिका पुरुषाच्या बरोबरीने आहे.
– डॉ. सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनी आणि अध्यक्ष, हिंदु समन्वय परिषद, नवी देहली.