‘नुकताच प्रयागराज येथील महाकुंभमेळा झाला. गेल्या काही महत्त्वाच्या कुंभमेळ्यानंतर जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर काही मोठे पालट झाले आहेत. या कुंभमेळ्यानंतर काय होईल ?, हे येणार्या काळातील घटनांचे लक्षण आहे का ? याविषयी ऊहापोह करणारा लेख येथे दिला आहे.
१. कुंभमेळा ही एक युगपरिवर्तन करणारी घटना
कुंभमेळा हे केवळ आध्यात्मिक आणि धार्मिक आयोजन नाही, तर त्याला ब्रह्मांडाचे संकेतही समजण्यात येते. काही ऋषी आणि विद्वान यांच्यानुसार कुंभमेळ्याचा प्रभाव केवळ धार्मिक उत्सवापुरता मर्यादित नाही, तर तो समाज, राजकारण, अध्यात्म आणि जागतिक व्यवस्था यांमधील परिवर्तनाचेही सूचक आहे.
कुंभमेळ्याच्या माध्यमातून जगातील भविष्यातील घटनांचे संकेत देणे शक्य आहे का ? कुंभमेळ्यानंतर महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना घडल्या. हा केवळ योगायोग नाही, तर संत, महर्षि आणि ज्योतिषी यांनी यासंदर्भात आधीच भविष्यवाणी केली होती. अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे की, कुंभमेळा ही एक युगपरिवर्तन करणारी घटना असते, जी जगाच्या पुढील टप्प्यांच्या सूचना देते.

२. गेल्या काही कुंभमेळ्यानंतर घडलेल्या घटना
अ. वर्ष १८५७ : प्रयागराज कुंभमेळा संपल्यानंतर बरोबर २ मासांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्य युद्ध’ झाले.
आ. वर्ष १९४५ : हरिद्वार कुंभमेळ्याच्या एका वर्षानंतर दुसरे महायुद्ध संपले.
इ. वर्ष २००१ : कुंभमेळ्यानंतर ११ सप्टेंबर २००१ चे आक्रमण झाले. त्यामुळे जागतिक राजकारण पालटले.
ई. वर्ष २०१३ : कुंभमेळ्यानंतर भारतात अनेक मोठे राजकीय पालट झाले.
उ. वर्ष २०२५ : यावर्षी झालेल्या प्रयागराजच्या कुंभमेळ्यानंतर काहीतरी आश्चर्यकारक घडणार आहे का ?
३. कुंभमेळा आणि ब्रह्मांडातील योगायोग
कुंभमेळा केवळ पंचांगाच्या गणनेचा परिणाम नाही, तर ग्रहाची विशेष स्थिती आणि ब्रह्मांडाची ऊर्जा यांचे संयोग यांच्याशी संबंधित असतो.
४. कुंभमेळ्याची ज्योतिषदृष्टीने गणना
प्रत्येक १२ वर्षांनी गुरु कुंभ राशीत प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीत असतो. प्रत्येक १४४ वर्षांनी एक विशेष युती होते, ज्यामध्ये गुरु, शनि आणि इतर ग्रह दुर्मिळ स्थितीत येतात. प्रत्येक १ सहस्र ७२८ वर्षांनी महाकुंभाचे एक चक्र असते, ज्यामध्ये ही ऊर्जा तिच्या शिखरावर असते. ही ब्रह्मांडाची स्थिती केवळ एक ज्योतिषदृष्टीने योगायोग आहे कि ती खरोखर पृथ्वी आणि मानवता यांच्यावर परिणाम करते ? या योगायोगाच्या प्रभावाने भविष्यातील घटनांचे अनुमान लावता येतात का ?
५. कुंभमेळा आणि इतिहासातील जग पालटणार्या घटना
कुंभमेळ्याच्या काळात किंवा त्यानंतर लगेचच काही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे पालट झाले आहेत. त्यासंदर्भातील काही उदाहरणे पाहूया.
अ. वर्ष १८५७ मध्ये प्रयागराज येथे कुंभमेळा झाला. या कुंभमेळ्याच्या काळात हिंदु संत आणि नागा साधू यांनी ब्रिटिशांविरुद्ध एकत्र येण्याची प्रतिज्ञा घेतली होती. त्यानंतर कुंभमेळ्याच्या अगदी २ महिन्यांनी भारताचा पहिला संघटित स्वातंत्र्यलढा झाला.
आ. वर्ष १९४५ मध्ये हरिद्वार येथे कुंभमेळा झाला. त्यानंतर लगेचच दुसर्या महायुद्धाचा शेवट झाला. या युद्धाने संपूर्ण जगाचे राजकारण आणि सत्ता यांचे संतुलन पालटले.
इ. वर्ष २००१ च्या प्रयागराज कुंभमेळ्यानंतर अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ चे आक्रमण झाले. त्यामुळे जागतिक राजकारण पालटले.
ई. वर्ष २०१३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यानंतर भारताच्या राजकारणात मोठे परिवर्तन झाले आणि हिंदुत्वाची एक नवी लाट उभी राहिली.
हे सर्व पहाता वर्ष २०२५ च्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यानंतर एक नवीन जागतिक युगाचा प्रारंभ होईल का ? या कुंभमेळ्यात वर्ष १४४ वर्षांनंतर अशी ग्रहस्थिती निर्माण झाली, जी ऐतिहासिक परिवर्तन दर्शवते. हे परिवर्तन हिंदुजागृती, भारताचे जागतिक नेतृत्व आणि सनातन धर्माचे पुनरुज्जीवन यांचे संकेत आहेत.
६. कुंभमेळ्याविषयी शास्त्रांमध्ये असलेले उल्लेख आणि भविष्यवाण्या
अ. अनेक ऋषी, संत आणि भविष्यवेत्ते यांनी कुंभमेळा अन् युगपरिवर्तन यांविषयी सांगितले आहे. महर्षि वेद व्यास यांनी सूचित केले होते की, जेव्हा कुंभमेळ्यात असाधारण संख्येने ऋषी आणि संत जमतील, तेव्हा धर्माच्या पुनर्स्थापनेचा काळ जवळ येईल.
आ. गोरखनाथ (नाथ संप्रदाय) यांनी भाकीत केले होते, ‘एका विशेष कुंभमेळ्यानंतर भारताचे पुनर्जागरण होईल आणि संन्याशांची शक्ती पुन्हा स्थापित होईल.’
इ. ‘कालचक्र तंत्र’ या संस्कृत ग्रंथामध्ये म्हटले आहे, ‘कुंभमेळा हा एक असा कार्यक्रम आहे, ज्या कालावधीत ईश्वरी चेतना जागृत होते आणि भावी पिढ्यांना मार्गदर्शन करते.’
ई. पाश्चात्त्य द्रष्टा नॉस्ट्रेडेमस याने काही भाकिते करून ठेवली आहेत. नॉस्ट्रेडेमस याने लिहून ठेवले आहे, ‘पूर्वेकडील एक महान उत्सव एका नवीन संकेत देईल आणि तो धर्माच्या पुनर्स्थापनेचे केंद्र बनेल.’
उ. तिबेटी बौद्ध ग्रंथांमध्ये म्हटले आहे, ‘कुंभमेळा हा असा काळ असतो, जेव्हा लोकांचे (सप्तलोक) द्वारे उघडतात आणि दिव्य शक्ती पृथ्वीवर अवतरतात.’
ऊ. आध्यात्मिक भविष्यवाणी : कुंभमेळ्यानंतर जगात अध्यात्माची एक नवी लाट येईल. धर्म, विज्ञान आणि अध्यात्म एका नवीन दिशेने वाटचाल करतील.
७. ग्रहांच्या दुर्मिळ स्थितीमुळे जागतिक परिवर्तनाचे संकेत
वर्ष २०२५ चा कुंभमेळा हा केवळ एक मेळा नसून ब्रह्मांडाच्या परिवर्तनाची एक घटना समजली जाते. त्यामुळे वर्ष २०२५ चा कुंभमेळा हा नवीन युगाचा प्रारंभ असण्याची शक्यता आहे.
१४४ वर्षांनंतर गुरु आणि शनि यांचा महासंयोग, तसेच मंगळ, शुक्र अन् सूर्य यांची दुर्मिळ युती, हे राजकीय आणि सामाजिक परिवर्तन हिंदु पुनर्जागरणाचे लक्षण आहे का ? भारत पुन्हा एकदा विश्वगुरु होण्याच्या मार्गावर आहे का ?, हे येणारा काळच सांगेल.
८. निष्कर्ष
कुंभमेळा, म्हणजे केवळ स्नान नाही, तर भविष्याची झलक आहे. कुंभमेळा ही केवळ तीर्थयात्रा नाही, तर तो भविष्यातील घटनांचे संकेत देणारा उत्सव आहे. जेव्हा जेव्हा कुंभमेळा आयोजित केला गेला, तेव्हा जगात मोठे पालट घडले आहेत. वर्ष २०२५ चा महाकुंभमेळा एक नवीन अध्याय लिहिणार आहे. हा एका नवीन युगाचा प्रारंभ आहे का ? हा केवळ एक योगायोग आहे कि विश्वातील एक संकेत आहे ? विचार करा, येणारा काळच सांगेल.’
– डॉ. सुरेश चव्हाणके, अध्यक्ष आणि मुख्य संपादक, ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनी, देहली.