हिंदूंवरील आघात आणि त्‍यांवरील उपाय यांविषयीचे प्रदर्शन सर्वांनी अवश्‍य पहावे ! – डॉ. सुरेश चव्‍हाणके यांचे आवाहन

हिंदु जनजागृती समितीच्‍या कक्षाला विविध मान्‍यवरांच्‍या भेटी

प्रदर्शन पहातांना १ श्री. शंभु गवारे, २ सौ. माया चव्हाणके, ३ सद्गुरु नीलेश सिंगबाळ, ४ डॉ. सुरेश चव्हाणके आणि अन्य मान्यवर

प्रयागराज, ३१ जानेवारी (वार्ता.) – सेक्‍टर ७ येथील हिंदु जनजागृती समितीच्‍या कक्षाला ‘सुदर्शन न्‍यूज’ वाहिनीचे संपादक डॉ. सुरेश चव्‍हाणके यांनी सपत्नीक भेट दिली. ‘हिंदूंवरील आघात आणि त्‍यांवरील उपाय सांगणारे फलक प्रदर्शन येथे लावण्‍यात आले आहे. ‘सर्वांना माझे आवाहन आहे की, हे प्रदर्शन अवश्‍य पहा आणि स्‍वत:च्‍या ज्ञानात निश्‍चित वाढ करून घ्‍या’, असे त्‍यांनी सांगितले. या वेळी ‘राष्‍ट्रीय गौरक्षा दला’चे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष श्री. सतीश कुमार हेही उपस्‍थित होते.

हिंदु जनजागृती समितीच्‍या कक्षाला अन्‍य मान्‍यवरांच्‍या भेटी

१. कानपूर, फतेहपूर येथील राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे जिल्‍हा संपर्क प्रमुख श्‍यामप्रकाशजी यांनी प्रदर्शनाला भेट दिली. समितीने लावलेले प्रदर्शन पाहून त्‍यांनी त्‍यांच्‍या भागातही ‘असे प्रदर्शन लावून धर्मशिक्षणवर्ग चालू करा’, अशी मागणी केली.

२. हरिद्वारचे भागवताचार्य मोहनगोपालपीठाधीश्‍वर कृष्‍णा संजयजी महाराज यांनीही समितीच्‍या कक्षाला सदिच्‍छा भेट दिली.