अविश्वास ठराव प्रविष्ट केल्यानंतर उपसभापतींना पदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही ! – अनिल परब, आमदार, ठाकरे गट
विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून डॉ. नीलम गोर्हे काम पहात आहेत. त्यांनी स्वत:हून पक्षाचे सदस्यत्व सोडलेले आहे. १० व्या परिशिष्टातील कायद्याच्या २ ‘अ’ मध्ये अपात्रतेची तरतूद आहे. त्याअंतर्गत आम्ही त्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका प्रविष्ट केली आहे.