विधान परिषदेच्‍या १२ सदस्‍यांच्‍या नियुक्‍तीवरील स्‍थगिती सर्वोच्‍च न्‍यायालयाने उठवली !

मुंबई – महाराष्‍ट्राच्‍या विधान परिषदेच्‍या १२ सदस्‍यांच्‍या नियुक्‍तीवरील स्‍थगिती सर्वोच्‍च न्‍यायालयाने उठवली आहे. ११ जुलै या दिवशी न्‍यायमूर्ती चंद्रचूड यांच्‍या खंडपिठापुढे याविषयीची सुनावणी झाली.

महाविकास आघाडीच्‍या काळात उद्धव ठाकरे मुख्‍यमंत्री असतांना तत्‍कालीन राज्‍यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्‍याकडे राज्‍यशासनाने १२ सदस्‍यांची सूची दिली होती; मात्र त्‍याविषयी निर्णय घेण्‍यात आला नव्‍हता. महाविकास आघाडीचे शासन कोसळल्‍यानंतर नव्‍याने आलेल्‍या शिवसेना-भाजप सरकारने राज्‍यपालांकडे सदस्‍यांची नवीन सूची दिली होती. या सूचीच्‍या विरोधात सर्वोच्‍च न्‍यायालयात आव्‍हान देण्‍यात आले होते. या याचिकेवरून न्‍यायालयाने नियुक्‍तीला स्‍थगिती दिली होती. ही स्‍थगिती उठवल्‍यामुळे या सदस्‍यांच्‍या नियुक्‍तीचा मार्ग मोकळा झाला आहे.