श्री उदासीन कार्ष्णि आश्रमाचे श्री गुरु शरणानंद यांची हिंदु जनजागृती समितीकडून घेण्यात आली भेट !

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीकडून चालवण्यात येत असलेल्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ अंतर्गत श्री उदासीन कार्ष्णि आश्रमाचे श्री गुरु शरणानंद यांची भेट घेण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीचे हिंदु धर्म आणि संस्कृती रक्षणाचे कार्य प्रेरणादायी ! – श्री १००८ श्री कमलानंद गिरि

तुम्ही किती तळमळीने हे कार्य करत आहात, हे दिसत आहे. तुमच्या प्रबोधन केंद्राला अवश्य भेट देऊ, असे प्रतिपादन येथील श्री कल्याण कमल आश्रमाचे श्री १००८ श्री कमलानंद गिरि यांनी केले.

राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी साधूसंतांनी कृतीशील होणे, ही काळाची आवश्यकता ! – स्वामी सुरेश महाराज

स्वामी सुरेश महाराज यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. या कार्याची समाजाला आवश्यकता आहे’, असे म्हटले. महाराजांना ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले.

देवता, संत आणि संस्कृती यांची विटंबना रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा आवश्यक ! – स्वामी कमेश्‍वरपुरी

या कायद्याविषयी सामाजिक माध्यमातील ‘फेसबूक’वरून थेट कार्यक्रम घेऊ शकतो. यासाठी माझे सभागृह तुम्हाला उपलब्ध करून देईन, तसेच धर्मकार्यासाठी जे साहाय्य हवे आहे, ते करण्यासाठी मी सदैव सिद्ध आहे.

हिंदु जनजागृती समिती करत असलेले धर्म कार्य आवश्यकच ! – महंत बाबा हरपाल दास

हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या हिंदु धर्म जागृतीच्या कार्याची सध्या आवश्यकताच आहे. तुम्ही हे कार्य करत आहात, याचा मला आनंद झाला, असे कौतुकोद्गार कलनौर, पानिपत येथील महंत बाबा हरपाल दास यांनी केले.

हिंदु जनजागृती समिती करत असलेले हिंदु राष्ट्र जागृतीचे कार्य आवश्यक ! – आखाड्याच्या प्रमुखांचे प्रतिपादन

हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यामध्ये राबवत असलेल्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ या संपर्क अभियानाच्या अंतर्गत श्री. सुनील घनवट यांनी अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी अनी आखाडा, अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाडा आणि अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा यांच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याची सध्या आवश्यकता ! – स्वामी श्री महाराज

भारत हे हिंदु राष्ट्रच आहे, त्याला वाचवण्याचे काम करावेच लागेल. हे राष्ट्र निधर्मी केल्याने प्राकृतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. निधर्मी शब्द घुसडण्यात आला आहे, त्याला आमचा विरोध आहे असे मार्गदर्शन हरिनगर येथील भागीरथ धामचे स्वामी श्री महाराज यांनी केले.

हिंदु राष्ट्र आले तरच गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर आदी संकटे दूर होऊ शकतील ! – स्वामी श्रद्धानंद महाराज

तुम्ही जे हिंदु राष्ट्रासाठी कार्य करत आहात ते चांगले आहे. हिंदु राष्ट्र आले तरच गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर आदी संकटे दूर होऊ शकतील, असा विश्‍वास झारखंड येथील गोड्डा जिल्ह्यातील अध्यात्म अन् स्वदेशीचे प्रखर वक्ता, शाही पिठाधीश्‍वर स्वामी महर्षि मेंहीं हृदय धामचे स्वामी श्रद्धानंद महाराज यांनी येथे व्यक्त केला.

हिंदु जनजागृती समितीचे कार्य अत्यंत प्रशंसनीय ! – श्री स्वामी बालकानंदजी महाराज

या प्रसंगी श्री स्वामी बालकानंदजी महाराज यांनी समितीच्या वतीने कुंभमेळ्यात लावण्यात आलेल्या धर्मजागृती प्रदर्शनाला आवर्जून भेट देणार असल्याचे सांगितले.

संस्कृती रक्षणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी व्हा ! – १००८ अनंत विभूषित श्री महामंडलेश्‍वर उमाकांतानंद सरस्वती महाराज

या वेळी १००८ अनंत विभूषित श्री महामंडलेश्‍वर उमाकांतानंद सरस्वती महाराज यांनी हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील ‘पाना’ला आपण ‘फॉलो’ करत असल्याचे आवर्जून सांगितले.