राज्यात साहाय्यक प्राध्यापक भरती होत नसल्याच्या विरोधात नेट-सेट पात्रताधारकांचे अनोखे आंदोलन !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे – राज्य सरकारकडून राज्यात साहाय्यक प्राध्यापक भरतीला अनुमती दिली जात नाही. त्यामुळे बेरोजगार तरुणांची काय स्थिती आहे, हे मुख्यमंत्र्यांना लक्षात आणून देण्यासाठी नेट-सेट पात्रताधारकांनी अनोखे आंदोलन केले. ‘नेट-सेट पात्रताधारकांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर स्वयंपाकी, धुणी भांडी करणारे कर्मचारी, वॉचमन तसेच बागकाम करण्यासाठी नियुक्त करा’, अशा मागणीचे शेकडो ई-मेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवून प्राध्यापक भरतीचा त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. नेट-सेट पी.एच्.डी.धारक संघर्ष समितीच्या वतीने ७ मार्च या दिवशी ही मोहीम राबवण्यात आली.