पर्यावरणविषयक नियमांच्‍या पालनाची सिद्धता करा, अन्‍यथा व्‍यवसाय बंद करण्‍याची सिद्धता ठेवा ! – गोवा राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळ

गोवा राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवीन निर्देश गोव्‍यातील सर्व व्‍यवसायांसाठी पर्यावरणविषयक नियमांच्‍या पालनाचे महत्त्व अधोरेखित करतात.

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पार्ट्यांमधून हणजूण-वागातोर येथे ध्वनीप्रदूषण

प्रशासनातील अनेकांचे आयोजकांशी आर्थिक हितसंबंध असल्यामुळे ध्वनीप्रदूषणावर कारवाई होत नाही, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही !

उत्तर गोव्यात क्लब आणि उपाहारगृहे यांच्याकडून पार्ट्यांद्वारे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण !

सध्या उत्तर गोव्यातील किनारी भागातील क्लब आणि उपाहारगृहे यांच्याकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांत वाजवल्या जाणार्‍या मोठ्या आवाजातील संगीतामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना पुष्कळ त्रास सहन करावा लागत आहे.

‘सनबर्न’ महोत्सवात ध्वनीप्रदूषणाचे नियम मोडल्यास कारवाई करण्याचे दायित्व पोलिसांचे ! – गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ

धारगळ येथे २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणार्‍या ‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल’मध्ये होणार्‍या ध्वनीप्रदूषणावर देखरेख ठेवण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ४ पथके सिद्ध केली आहेत.

३ आस्थापनांचा ‘कन्सेंट टू ऑपरेट’ परवाना रहित, तर ४ आस्थापनांना नोटीस

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कर्णकर्कश संगीत वाजवून ध्वनीप्रदूषण करणारे ‘बार अँड रॅस्टॉरंट’ आणि अन्य आस्थापने यांच्यावर धडक कारवाई चालू केली आहे.

ध्वनीप्रदूषणासंबंधी अवमान याचिकेवरील सुनावणी १३ डिसेंबरपर्यंत स्थगित

पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी निष्क्रीय असल्यानेच ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात लोकांना स्वखर्चाने न्यायालयीन लढा द्यावा लागतो !  

पेडणे भागात ‘सनबर्न’ महोत्सव लादण्याचा प्रयत्न हाणून पाडू ! – भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांची चेतावणी

सरकारने पेडणे येथे ‘सनबर्न’ महोत्सव लादण्याचा केलेला प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पेडणे येथील जनता सज्ज झाली आहे. ‘सनबर्न’ महोत्सवाच्या विरोधात मी जनतेसमवेत रहाणार आहे, अशी चेतावणी भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली आहे.

हणजूण-वागातोर समुद्रकिनारपट्टीत ‘नाईट क्लब’कडून ध्वनीप्रदूषण चालूच

प्रशासन आणि पोलीस यांच्या सहकार्याविना असे ध्वनीप्रदूषण होऊच शकत नाही !

SC On Delhi Firecrackers Ban : दिवाळीत बंदी असतांनाही फटाके फोडल्यावरून सर्वोच्च न्यायालयाची अप्रसन्नता !

प्रतिबंध असतांनाही फटाके कसे फोडले गेले ?, हे आम्ही राज्य सरकारला विचारू इच्छितो, असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने देहलीच्या पोलीस आयुक्तांकडूनही उत्तर मागवले आहे.

गोव्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुर प्रतिमादहन प्रथेच्या अंतर्गत ध्वनीप्रदूषणासंबंधी पोलिसांकडे अनेक तक्रारी

स्थानिक लोकप्रतिनिधी मतांसाठी अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करतात का ?