पणजी, १ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुर प्रतिमादहन प्रथेच्या अंतर्गत पहाटे प्रतिमा जाळल्या जाईपर्यंत ध्वनीप्रदूषण झाल्याच्या विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी अनेक तक्रारी पोलिसांकडे केल्या आहेत. काही ठिकाणी ३१ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत ध्वनीप्रदूषण करण्यात आले. याविषयी काही नागरिकांनी सामाजिक माध्यमातून तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. पणजी पोलिसांनी ३० ऑक्टोबरला रात्री १२ वाजल्यानंतर ध्वनीप्रदूषणासंबंधी आलेल्या तक्रारींची गंभीर नोंद घेऊन काही ठिकाणचे कार्यक्रम बंद केल्याचे वृत्त आहे; मात्र अन्यत्र पोलिसांनी ध्वनीप्रदूषणासंबंधीच्या तक्रारींची अपेक्षित नोंद घेतली नाही.
नरकासुर प्रतिमांच्या दहनानंतर लोखंडी सांगाडे रस्त्यावरच : वाहनचालकांना फटका
पणजी – राज्यात अनेक ठिकाणी नरकासुर प्रतिमांचे रस्त्यावरच दहन करण्यात आले. त्यानंतर प्रतिमांचे सांगाडे आणि राख रस्त्यावरच होती. लोखंडी सांगाड्यावर सिद्ध केलेल्या नरकासुर प्रतिमा जळाल्यानंतर त्यांचे लहान लहान खिळे आणि अन्य साहित्य रस्त्यावर पडलेले होते. याचा वाहनचालकांना फटका बसला.
संपादकीय भूमिकास्थानिक लोकप्रतिनिधी मतांसाठी अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करतात का ? |