शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय : कोकणातील ५ जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्रात पालट !

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील सागरी क्षेत्राच्या सुधारित आराखड्याला (सी.झेड.एम्.पी.) केंद्रीय पर्यावरण विभागाने मान्यता दिली आहे.

दोनापावला येथील आधुनिक वैद्याच्या बंगल्यात चोरी करणारा चोरटा जेरबंद

दोनापावला येथील आधुनिक वैद्य संजय खोपे यांच्या बंगल्यातून ४५ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरल्याच्या प्रकरणी पणजी पोलिसांनी सुरेदर छेत्री (वय ३१ वर्षे, रहाणारा नेपाळ) याला ‘वेब हनी ट्रॅप’च्या साहाय्याने बंगालमधून कह्यात घेतले आहे.

‘आरोग्य आधार’ अ‍ॅपद्वारे धर्मादाय रुग्णालयांतील खाटा राखीव करता येणार ! – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

या प्रकरणामध्ये अपप्रकार करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई होणेही आवश्यक आहे !

अजमेर (राजस्थान) येथे विद्यार्थिनींची कंबर आणि नितंब यांचा आकार मागणार्‍या शाळेच्या विरोधात पालकांचा संताप !

विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या खेळाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाने काही नियम ठरवून दिले आहेत. त्यांच्याकडे कानाडोळा करून अशा प्रकारे अनावश्यक माहिती मागवणार्‍या शाळा व्यवस्थापनावर कारवाई व्हायला हवी !

हिमाचल प्रदेशातील अनी येथील ५ हून अधिक इमारती कोसळल्या !

हिमाचल प्रदेशात प्रत्येक वर्षी अत्यधिक पाऊस असतोच; परंतु यंदा येथे मोठ्या प्रमाणात घरे आणि इमारती कोसळण्याच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या. यामागे डोंगरांवर मनमानी पद्धतीने इमारती बांधण्यात येत असल्याचे आरोप होत आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे आतापर्यंत ३५१ लोकांचा मृत्यू !

हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या २ दिवसांत सतत मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

बिहार सरकारने माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या नावे असलेल्या बागेचे नाव पालटल्यावरून वाद !

पाटलीपुत्र येथील कंकडबाग येथे असलेल्या ‘अटल बिहारी वाजपेयी पार्क’चे नाव पालटून ते ‘कोकोनट पार्क’ करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर बिहारचे पर्यावरणमंत्री तेज प्रताप यादव यांनी त्याचे नव्याने उद्घाटनही केले आहे.

देहलीतील महिला आणि बालकल्याण विभागाच्या उपसंचालकाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक

अशा विश्‍वासघातकी आणि नात्याला काळीमा फासणार्‍यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

आधारकार्ड अद्ययावत करतांना सतर्क रहाण्याविषयी यु.आय.डी.ए.आय.ची सूचना

आधारकार्ड अद्ययावत करण्याविषयी व्हॉट्सअ‍ॅप किंवा एस्.एम्.एस्. द्वारे येणार्‍या संदेशाविषयी सतर्क रहाण्याची सूचना ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ अर्थात् ‘यु.आय.डी.ए.आय.’ने नागरिकांना दिली आहे.

केंद्रीय दक्षता आयोगाकडे वर्ष २०२२ मध्ये भ्रष्टाचाराच्या १ लाख १५ सहस्र तक्रारी

देशात एका वर्षांत भ्रष्टाचाराच्या १ लाखाहून अधिक तक्रारी येतात, यावरून तक्रारी न येण्याचे प्रमाण किती असणार आणि देशात भ्रष्टाचार किती प्रमाणात होत असणार, हे लक्षात येते !