हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे विद्यार्थिनींची अश्‍लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित !

‘याविषयी कुणाला सांगितल्यास आणखी छायाचित्रे प्रसारित करणार’, अशी धमकी दिली आहे. एवढेच नव्हे, तर या टोळीने पोलिसांना उद्देशून ‘तुमच्यात धमक असेल, तर आम्हाला शोधून दाखवा. जय टिपू सुल्तान’,  अशी पोस्ट प्रसारित केल्याचे समजते.

‘वेश्या’ हा व्यवसाय नसून स्त्रियांना नाडणारी संघटित गुन्हेगारी ! – अरुण पांडे, ‘अर्ज’ संस्था

डॉ. रूपेश पाटकर यांच्या ‘अर्जमधील दिवस’ या वेश्या वस्तीतील प्रत्यक्ष कामाविषयीच्या अनुभवांवरील पुस्तकाला या वर्षीचा ‘सरस्वती लक्ष्मण पवार पुरस्कार’ घोषित झाला. या पुरस्काराचे वितरण सावंतवाडी शहरातील श्रीराम वाचन मंदिरात झाले.

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली : वाहतूक ठप्प !

अतीवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर ६ ऑगस्टला सकाळी दरड कोसळली. त्यामुळे टी-२ बोगद्याजवळील महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

प्रतापसिंह उद्यानात राजे प्रतापसिंह यांचा पुतळा सुशोभिकरणाच्या प्रतीक्षेत !

२२ ऑगस्टला राजेंची पुण्यतिथी असून त्या अगोदर महापालिका प्रशासनाने या पुतळ्याची रंगरंगोटी करावी, तसेच बाजूच्या चौथर्‍याचे काम करावे.

सभागृह कि गोंधळगृह ?

सभागृह बंद पाडण्यासाठी विरोधी पक्ष काही ना काही कारणेच शोधत असतात. अधिवेशन चालू होण्यापूर्वीच ‘सरकारला कोणत्या सूत्रांवरून कोंडीत पकडायचे ?’, ते विरोधकांनी आधीच ठरवलेले असते आणि तसे ते सांगतातही. त्यामुळे अधिवेशन हे ‘सरकारला कोंडीत पकडण्यासाठी कि जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ?’, असा प्रश्न पडतो !

मणीपूरमध्ये नव्याने झालेल्या हिंसाचारात ३ जण ठार !

मणीपूरमध्ये सुरक्षादल आणि जमावात गेल्या २४ घंट्यांपासून चकमक चालू आहे. या चकमकीत तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये युमनम जितेन मैतेई (४६), युम्नाम पिशाक मैतेई  (६७) आणि युम्नाम प्रेमकुमार मैतेई (३९) यांचा समावेश आहे.

अखंड हिंदु राष्ट्रासाठी सातत्याने सेवार्थ रहाणे हीच स्व. अधिवक्ता गोविंदजी गांधी यांना खरी श्रद्धांजली ! – अधिवक्ता दत्तात्रय सणस

क्रांतीकारकांचे शिरोमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अखंड हिंदु राष्ट्र साकारण्यासाठी चालू केलेल्या राष्ट्रयज्ञामध्ये स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्व. अधिवक्ता गोविंद गांधी यांचे आज द्वितीय पुण्यस्मरण आहे.

श्रीरामकथा ज्ञानयज्ञातील श्रीराम याग सोहळ्याची भक्तीपूर्ण वातावरणात वेदमंत्रघोषाने पूर्णाहुती !

नगर येथील बडीसाजन मंगल कार्यालयात चालू असलेल्या श्रीरामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात विश्वकल्याणासाठी शास्त्रोक्त श्रीराम याग संपन्न झाला. वेदमंत्रघोषात या यागाची विधीवत पूर्णाहुती प.पू. माताजी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या हस्ते करण्यात आली.

भिवंडी येथे ४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍याला अटक !

कठोर शिक्षेअभावी गुन्हेगारांना शिक्षेचे भय वाटत नाही आणि गुन्हे वाढत रहातात, हे लक्षात घेऊन सरकारने गुन्हेगारांना धडकी भरेल, अशी कारवाई केली पाहिजे !

कल्याण येथे रस्त्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न करणारा अटकेत !

गुन्हेगारांवर वचक बसेल, अशी कारवाई पोलिसांनी केली, तरच असे प्रकार रोखता येतील !