हिंदु नववर्ष स्वागत समितीकडून ९ एप्रिल या दिवशी स्वागत यात्रेचे आयोजन !

पनवेल – गुढीपाडव्याच्या निमित्त ‘हिंदु नववर्ष स्वागत समिती’ने हिंदु नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले आहे. ही भव्य शोभायात्रा ९ एप्रिल या दिवशी सकाळी ७ वाजता खांदा वसाहत येथील आग्री शाळा येथून चालू होईल. नंतर ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुढे शनी मंदिर ते तुलसी प्रेरणा सोसायटी येथे समाप्त होईल.

या शोभायात्रेत महिला दुचाकी पथक, लेझीम पथक, लाठीकाठी पथक, ध्वज पथक, सायकल पथक, चित्ररथ, मृदुंग टाळ आणि भजनी मंडळ असणार आहे. यामध्ये वारकरी संप्रदाय आणि विविध संघटना सहभागी होणार आहेत. ‘आपण सर्वांनी मित्र परिवारासह पारंपरिक वेषात सहभागी व्हावे’, असे आव्हान समितीने सामाजिक माध्यमातून केले