प्रभु श्रीरामांचे विडंबन करणार्‍या आस्थापनाच्या विरोधात बांदा येथील रामभक्तांचे ‘त्याग’ आंदोलन वर्षभर चालू

कोणतीही तोडफोड नाही. अपशब्द नाही. ‘बॅनरबाजी’ नाही, तसेच आस्थापनाचे नावही न घेता आंदोलन चालू आहे. या आंदोलनाचा परिणाम म्हणजे ‘ते’ वादग्रस्त विज्ञापन दूरदर्शन वाहिन्यांवर दाखवण्याचे प्रमाण उणावले !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांच्या शौर्याचा जागर

याप्रसंगी विविध फलकांच्या माध्यमातून क्रांतीकारकांचा शौर्यशाली इतिहास समाजासमोर सांगितला गेला. याचा लाभ एकूण ५५० जणांनी घेतला.

‘सिंधुदुर्ग पॅटर्न’ राबवून महाराष्ट्र राज्य शिक्षणात अग्रेसर रहाण्यासाठी प्रयत्नशील ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्हा गेली ८ ते १० वर्षे इयत्ता १० वी आणि १२ वीच्या निकालांमध्ये राज्यात अग्रेसर आहे. हा जिल्हा हुशार विद्यार्थ्यांचा जिल्हा आहे.

मळगाव (सावंतवाडी) येथे जीर्ण कापडाचे, वेडेवाकडे कापलेले आणि अशोक चक्र मध्यभागी नसलेले राष्ट्रध्वज वितरित !

. . . असे राष्ट्रध्वज पाहिल्यावर ते बनवण्याचा ठेका पाकिस्तानात दिला होता कि काय ? असा प्रश्न पडतो. लोकानी निश्चिती करूनच राष्ट्रध्वज स्वीकारावा आणि सन्मानपूर्वक आपल्या घरी फडकवावा.

भुईबावडा घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प

भुईबावडा घाटात दरडीचा मोठा भाग रस्त्यावर आला. संपूर्ण रस्ता दरडीच्या ढिगाने व्यापल्याने वाहतूक ठप्प झाली. या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे वळवण्यात आली आहे.

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) – अपकीर्ती करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी खानोली येथील युवकावर गुन्हा नोंद

समाजाला धर्मशिक्षण न दिल्याने नीतीमत्ता अधोगतीला गेल्याचे उदाहरण !

वेंगुर्ला शहरातील एका ७/१२ वरील कायम कुळाचे नाव परस्पर काढले !

मनमानी कारभार करणार्‍या तलाठी कार्यालयातील कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील खड्डे लोकसहभागातून बुजवले !

येथील रिक्शाचालक आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी लोकसहभागातून हे खड्डे बुजवल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न तूर्तास मिटला असला, तरी श्री गणेशचतुर्थीपूर्वी तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

सिंधुदुर्गात धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क रहाण्याचे आवाहन !

पावसाचा जोर पहाता धरणांच्या पाणलोट क्षेत्रामधून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पुढील १-२ दिवसांत सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरून पूर्ण संचय पातळीवरील अतिरिक्त पाणी धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात ओसंडून वहाणार आहे.

तालिबानी पद्धतीने हिंदूंची हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर आणि तात्काळ कारवाई करावी !

तालिबानी पद्धतीने हिंदूची हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर आणि तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांच्या वतीने करण्यात आली.